Monsoon Session: नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अपात्र होणार का? अनिल परबांनी सांगितली कायदेशीर बाजू

आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आली आहे.
Neelam Gorhe_Manisha Kayande
Neelam Gorhe_Manisha Kayande
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या विधानपरिषदेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांना अपात्रतेची नोटीस महाविकास आघाडीच्या आमदारांकडून पाठवण्यात आली आहे.

गोऱ्हे या उपसभापती असल्यानं त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अपात्र व्हावं लागेल तसेच कायंदे यांच्यावरही लोकप्रतिनिधी कायद्याच्या १० शेड्युल प्रमाणं अपात्र व्हावं लागेल असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं. (Will Neelam Gorhe Manisha Kayande be disqualified Legal side explained by Anil Parab)

Neelam Gorhe_Manisha Kayande
Maharashtra Politics : नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची नोटीस

नीलम गोऱ्हेंवर अपात्रतेबाबत कायदेशीर बाजू सांगताना परब म्हणाले, "काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. त्यामुळं कायद्यानुसार, दहाव्या शेड्युलमध्ये २ अ नुसार जी अपात्रतेची तरतूद आहे.

त्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर अपत्रतेची नोटीत दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टानं ही सगळी प्रकरण अध्यक्षांकडं पाठवलेली आहेत. सध्या विधानपरिषदेत सभापती नाहीत त्याजागी उपसभापती काम बघणार आहेत.

पण उपसभापतींवरच अपात्रतेचा ठराव आहे, म्हणून आम्ही त्यांना रिमुव्हल नोटीसही दिली आहे" (Latest Marathi News)

Neelam Gorhe_Manisha Kayande
Monsoon Session: 'गटाचं टेन्शन अन् बसायचं कुठे?' राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मारली दांडी

यासाठी केला सभात्याग

नवाब रेबिया केसमध्ये देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, सभापतींवर जेव्हा अविश्वास दाखवला जातो तेव्हा त्यांना या खुर्चीवर बसण्याचा कायदेशीर आणि नैतिक अधिकार राहत नाही.

जोपर्यंत अपात्रतेचा निकाल लागत नाही तसेच रिमुव्हल नोटीस फायनल होत नाही. तोपर्यंत या उपसभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये, अशी आम्ही सर्व आमदारांनी भूमिका घेतली आहे.

पण आम्हाला आमची भूमिका सभागृहात मांडू न दिल्यानं आम्ही आजच्या दिवशी सभात्याग केला आहे. आता यापुढं काम कसं करायचं? असा प्रश्न आहे. (Marathi Tajya Batmya)

Neelam Gorhe_Manisha Kayande
"सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली"; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी | Monsoon Session

सरकार माजलं आहे

हे बहुमताचं सरकार माजलं आहे, हे विरोधकांना दाबून टाकत आहे. उपसभापती सरकारच्या बाजूनं काम करत आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे दाबून टाकण्याच काम करणाऱ्या उपसभापतींना पदावरुन राहू नये, अशी भूमिका आम्ही घेतली आहे.

आज बहिष्काराचा निर्णय झाला त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.