NCP News: शरद पवारांचे फोटो वापरणार नाही; अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Affidavit in Supreme Court ncp: यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र अजित पवारकडून सादर करण्यात आले आहे.
 Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

मुंबई- अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र अजित पवारकडून सादर करण्यात आले आहे. साम टीव्हीकडून यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Will not use photos of Sharad Pawar Ajit Pawar group submitted affidavit in Supreme Court ncp)

दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावलं होतं. शरद पवारांचे फोटो का वापरता? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला होता. शरद पवार यांचे फोटो वापरले जात असल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोर्टात विचारणा करण्यात आली होती. यावरुन कोर्टाने अजित पवार गटाला फोटो वापरणार नाही असं लिखित द्या, असे आदेश दिले होते. त्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

 Ajit Pawar
Sharad Ponkshe: "हिंदी राष्ट्रवाद जो काँग्रेसनं स्वीकारला..."; शरद पोंक्षेंच्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचे या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचा निकाल दिला होता. या निर्णयाला शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. दोन्ही गटाचे वकील सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करत आहेत.

अजित पवार गटाने वेगळ्या चिन्हाचा विचार करावा अशा आशयाचे वक्तव्य देखील सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी दरम्यान करण्यात आले होते. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, सुप्रीम कोर्टाने केवळ सूचना दिल्या आहेत. कोणताही आदेश दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यास वेगळ्या चिन्हाचा विचार केला जाईल. सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीकडे लक्ष असणार आहे.

 Ajit Pawar
रिलस्टार धनंजय पोवार 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक? शरद पवारांची घेतली भेट, डीपींना पवारांनी दिला 'हा' सल्ला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार बहुसंख्य आमदारांसोबत महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाला दिला आहे. मात्र, या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले गेले असून सुनावणी सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.