Rahul Gandhi Ashadhi Wari: राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार? वाचा काँग्रेसची काय आहे स्ट्रॅटेजी

राज्यात आषाढी वारीला येत्या 30 जूनपासून सुरुवात होत आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

मुंबई : राज्यात आषाढी वारीला येत्या ३० जूनपासून सुरुवात होत आहे. यंदा या वारीत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. आळंदी-देहू ते पंढरपूर अशी जाणारी पायी वारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं याचा लाभ राहुल गांधी घेणार असल्याचं काँग्रेसच्या सुत्रांकडून कळतं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे प्लॅनिंग असल्याचं सांगितलं जात आहे. (Will Rahul Gandhi participate in Ashadhi Vari read what is the strategy of Congress)

Rahul Gandhi
Pune Drugs Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सूस-बाणेर इथल्या अनधिकृत बार-हॉटेल्सवर हातोडा! कारवाईला वेग

काँग्रेसच्या सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आषाढी वारीमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर राहुल गांधींनी वारीत सहभाग नोंदवला तर काँग्रेससाठी निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो. राहुल गांधींनासाठी 'भारत जोडो' यात्रेचा अनुभव गाठीशी आहेतच.

Rahul Gandhi
Kejriwal Sugar Drop: सीबीआयकडून अटक अन् केजरीवालांची शुगर झाली डाऊन; काय घडलं नेमकं जाणून घ्या

काँग्रेसनं लोकसभेच्या १३ जागा जिंकल्या

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं १३ जागा जिंकत दणदणी विजय मिळवल्यानं आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्ट्रॅटजी सुरु झाली आहे. राहुल गांधी जर वारीत सहभागी झाले तर त्यांना मोठ्या जनसमुदयाच्या भेटी घेता येतील. यामध्ये वारकरीच नव्हे तर अनेकांच्या गाठीभेटी घेता येतील, त्याचा फायदा काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: "यंदा विरोधकांचा आवाज अधिक मोठा आहे"; राहुल गांधींकडून बिर्लांचं केलं अभिनंदन

या तारखेला होऊ शकतात सहभागी

राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आषाढी वारीतही त्यांनी सहभागी व्हावं यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळं माळशिरस ते वेळापूर या दरम्यान, राहुल गांधी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com