मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्ह अजित पवार यांच्याकडे असेल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १४ फेब्रुवारीपर्यंत द्यायचा आहे. नार्वेकर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेतली आणि अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय देतील अशी दाट शक्यता आहे. मात्र, राहुल नार्वेकर यांनी वेगळे संकेत दिले आहेत.
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला होता. तसेच शिंदे-ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेले कागदपत्रं देखील त्यांनी विचारात घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात असेच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Will take different decision on NCP Indicated by Assembly Speaker AJIT sharad pawar Rahul Narvekar)
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
राहुल नार्वेकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगळा निर्णय घेतील असा तर्क लावला जाऊ शकतो. मात्र, राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेऊन शिवसेना आमदार प्रकरणात निकाल दिला होता. अजित पवार गटाकडे देखील आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील याबाबत संभ्रम कायम असणार आहे. १४ फेब्रुवारीला नार्वेकर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.