सोलापूर : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक आमदारांची आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार की तेच राहणार, याचीही उत्सुकता आहे.
सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत शहाजी पाटील हे शिंदे सेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनाही राज्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. दुसरीकडे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. त्या आमदारांच्या माध्यमातून माढ्याची खासदारकी दुसऱ्यांदा सहजपणे मिळेल, असे भाजपला विश्वास आहे. तसेच माजी मंत्री सुभाष देशमुख यांनाही विस्तारात मंत्रिपदाची अपेक्षा असून त्यांच्या कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले होते, ‘सोलापूरच्या बाबतीतील तुमची माया पातळ होऊ देऊ नका’. त्यानंतर त्यांनाही विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला डावलणे भाजपला परवडणारे नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढाईची आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदे सेना व भाजपला समान मंत्रिपदे मिळतील, अशी आशा आहे.
शिंदे सेनेने मागितले जिल्ह्यातील ५ मतदारसंघ
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शिंदे सेनेने जिल्ह्यातील शहर मध्य, सांगोला, करमाळा, माढा व मोहोळ या पाच विधानसभा विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. आता जागावाटपात कोणता मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या मतदारसंघाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे असणार आहे.
पालकमंत्रीपद भाजप की शिंदे सेनेकडे?
जागा वाटपात जिल्ह्यातील माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर उत्तर, बार्शी, पंढरपूर-मंगळवेढा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. सध्या त्या सर्वच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्याठिकाणी अजूनही भाजपचेच पारडे जड आहे. आता शिंदे सेनेला त्यांना मिळणाऱ्या मतदारसंघात घाम गाळावा लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री शिंदे सेनेचा व्हावा, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. प्रा. तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण, भाजप पालकमंत्रीपद सोडणार नाही हे निश्चित. आता जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.