Savarkar issue and MVA : सावरकरांच्या मुद्द्यावरुन 'मविआ'त फूट पडणार का? जयराम रमेश यांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊत यांच्याशी आपलं बोलणं झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
jayram Ramesh
jayram Ramesh
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीत एकत्र असलो तरी सावकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे असल्याचं मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी हे विधान केलं आहे. (Will there be a split in Maha Vikas Aghadi over Savarkar issue Jairam Ramesh said clearly on it)

jayram Ramesh
MNS Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंना रोखलं! मनसे आक्रमक

रमेश म्हणाले, "माझं संजय राऊतांशी बोलणं झालं यावर ते म्हणाले की, माझ्या मनात जे आहे ते मी म्हटलंय तर तुमच्या नेत्याच्या मनात जे आहे ते त्यांनी म्हटलंय. पण याचं महाविकास आघाडीला काही घेणंदेणं नाही. कारण मविआचा विचार आणि दृष्टीकोन वेगळा आहे. मविआला आता तीन वर्षे झाली आहेत"

हे ही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

यापूर्वी आम्ही राजकारणात विरोधक होतो. त्यानंतर मविआसाठी आम्ही किमान समान कार्यक्रम बनवला आणि या सरकारमध्ये सामिलही झालो. मी संजय राऊतांना विचारलं की, असं बोललं जातंय की राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील भूमिकेमुळं महाविकास आघाडी अडचणीत येईल. यावर ते म्हणाले, हे कदापी होणार नाही. कारण मविआचा विचार हा पूर्णपणे वेगळा विचार आहे, असंही यावेळी जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.