हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार! विधिमंडळातील बैठकीत चर्चा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रसंग्रहित छायाचित्र
Updated on

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता. १८) संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत आनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल.

संग्रहित छायाचित्र
कोहलीसाठी आयसीसी ट्रॉफी ठरते ‘विराट’; वाचा काय सांगतो ‘रेकॉर्ड’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी मर्यादित प्रवेश राहील. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करावी. सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टनसिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.

आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलिस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना भागवत यांनी आरोग्य विभागाला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.