Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

BJP News: दादरमधील एका सोसायटीत राहणारी ही महिला सोसायटीतसुद्धा चाकू घेऊन फिरत असते. याशिवाय ती लोकांच्या दारांवर झाडूने मारते, तिचे अनेक व्हीडिओ समोर आलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ती मंत्रालयात सातत्याने येत होती, अशी माहिती मिळाली आहे.
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....
Updated on

Mumbai Crime News: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर एका महिलेने हल्ला केला होता. सदरील महिलेची ओळख आता पटली आहे. ही महिला सोसायटीमध्ये सातत्याने हिंसा करत असल्याचं निष्पन्न झालं असून तिचे सीसीटीव्ही फुजेट समोर आलेले आहेत.

दादरमधील एका सोसायटीत राहणारी ही महिला सोसायटीतसुद्धा चाकू घेऊन फिरत असते. याशिवाय ती लोकांच्या दारांवर झाडूने मारते, तिचे अनेक व्हीडिओ समोर आलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ती मंत्रालयात सातत्याने येत होती, अशी माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे ''मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे..'' असं ती सतत म्हणत असते. ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं बोललं जातंय. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांना ही महिला सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागत असते. यापूर्वी भाजप कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.