'लाडकी बहीण'ला कर्नाटकातील प्रमाणपत्राची अडचण; स्थलांतरित युवती, विवाह झालेल्या महिलांचे अर्ज नाकारले

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र सरकारने जन्म व शाळेचा दाखला कर्नाटकातील असल्याचे कारण पुढे केल्यामुळे स्थलांतरित महिलांना योजनेचा लाभ घेणे कठीण झाले आहे.

अथणी : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. कर्नाटकातून सीमाभागात असणारी अनेक कुटुंबे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ५० वर्षांपासून आहेत. ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्यास गेल्यानंतर योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे सीमाभागातील महिलांची अडचण झाली आहे. योग्य माहिती नसल्याने अनेक शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागत आहेत.

कर्नाटकातील (Karnataka) कुटुंबे महाराष्ट्रात स्थायिक झाली आहेत. त्यांनाही लाडकी बहीण, या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. १९७२ च्या दुष्काळात सीमाभागातील विजापूर, चिक्कोडी, बेळगाव, यादगिरी, गुलबर्गा जिल्ह्यांतून शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील अनेक गावांत स्थायिक झाली आहेत. त्यांचे स्थायिक झालेल्या ठिकाणी शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड आहे.

Ladki Bahin Yojana
'राज्यात तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल'; शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचा मोठा दावा

परंतु, महाराष्ट्र सरकारने जन्म व शाळेचा दाखला कर्नाटकातील असल्याचे कारण पुढे केल्यामुळे स्थलांतरित महिलांना योजनेचा लाभ घेणे कठीण झाले आहे. स्थलांतरित मूळचे कर्नाटकातील असले तरी ५० वर्षांपासून ते विविध भागांत वास्तव्यास आहेत.१९७२ च्या दुष्काळात शेकडो कुटुंबे ऊसतोड, वीटभट्टी काम, गवंडी कामासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्र सीमाभागात रहिवासी झाले आहेत.

सरकारच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती एखाद्या गावात पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षे राहिल्यास त्या गावचा, राज्याचा रहिवासी ग्राह्य धरला जातो; परंतु सध्याच्या योजनेत अर्ज घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्नाटकातील कोणतेही कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक असल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने देणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana
'केसरकरांना शिक्षण खाते कळालेच नाही, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका'; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केलीये मागणी?

महाराष्ट्रातील व्यक्ती कर्नाटकात सेवेत

  • कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या ८६५ खेड्यांतील महिलांनाही महाराष्ट्रातील लाडकी बहीण, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने अनुमती द्यावी.

  • कर्नाटक सरकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कन्नड भाषिकांसाठी गडीनाडू कन्नडअंतर्गत कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक कन्नड भाषिकांना त्याचा लाभ होत आहे. या जिल्ह्यातील बरेच नोकरवर्ग गडीनाडू कन्नड प्रमाणपत्र घेऊन कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील व्यक्ती सेवा बजावत आहेत.

तासगाव तालुक्यात माझा विवाह झाला आहे. विवाहानंतर मी या गावची रहिवासी आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेस शाळेचा दाखला अनिवार्य केला आहे. माझा जन्म व शिक्षण कर्नाटकात असल्यामुळे या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेसाठी शिधापत्रिका व आधारकार्ड ग्राह्य धरणे गरजेचे आहे.

-स्नेहल झेंडे, रहिवासी, तासगाव तालुका

आम्ही कर्नाटकातील असून, महाराष्ट्रात विवाह केला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेत कर्नाटकच्या कोणत्याही अटी न घालता महाराष्ट्रातील आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिकेवर या योजनेचा लाभ द्यावा.

-रूपाली कांबळे, मुंबई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com