Maharashtra Police : धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून महिला पोलिसावर बलात्कार; गर्भपातासाठी खायला घातल्या गोळ्या

महिला पोलिसाला (Women Police) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
Women Police Officer
Women Police Officeresakal
Updated on
Summary

पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्याही खायला घातल्या.

सांगली : सांगलीतील एका महिला पोलिसाला (Women Police) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित हा पोलिसच असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Women Police Officer
Congress मध्ये 45 आमदारांचा गट, त्यातील 31 आमदार फुटून बाहेर जातील याची..; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शब्बीर ऐनापुरे (वय ३५), शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघेही रा. सह्याद्रीनगर, संजयनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील वसीम ऐनापुरे हा पोलिस बॅंड पथकात असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शनिवारी (ता. ८) मध्यरात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला पोलिसाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Women Police Officer
मोठी बातमी! जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत, तपासासाठी 500 पोलिस तैनात

पोलिसांनी सांगितलेली महिती अशी की, संशयित वसीम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ४ मार्चपासून ६ जुलैपर्यंत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार इच्छेविरुद्ध बलात्कार केला. यामध्ये पीडिता गर्भवती राहिली.

Women Police Officer
Belgaum : जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत; संशयितांकडून हत्येची कबुली, मठाकडं भाविकांची रीघ

पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्याही खायला घातल्या. याबाबत पीडितेने तक्रार करू नये यासाठी वसीम याच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरून धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संशयित वसीम यास अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.