अधिवेशन सुरू होण्याआधीच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ

याच पार्श्वभुमीवर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
crime
crimegoogle
Updated on

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. अनेक नाट्यमय घडोमोडी आणि आरोपप्रत्यारोपांत कालचा पहिला दिवस पार पडला. दरम्यान, याच पार्श्वभुमीवर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याच प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

crime
'कोश्यारीजी वापसा जा, महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रस्ताव आणणार'

घडलेली घटना अशी, काल विधानभवन परिसरात अनेक घटना घडल्या. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळाले. दरम्यान, एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याच प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी तिला रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. साराबाई पाखरे असे या ६० वर्षीय महिलेचे नाव आहे. या महिलेवर घाटकोपर येथील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने नोंदवून अडकवल्याचा तिचा आरोप होता.

याप्रकरणी संबधित पोलिसांवर कारवाई व्हावी. तसेच आपल्यवरील गुन्हा रद्द व्हावा, या मागणीसाठी तिने विविध ठिकाणी प्रयत्न केला. मात्र या सगळ्यात यश न आल्यने पाखरे यांनी काल सायंकाळी पाचच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य इमारतीसमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी तिला रोखले, या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिला सीआरपीसी ४१ (ब) अन्वेय नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

crime
All The Best! आजपासून बारावीच्या परीक्षा; कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()