Shiv Sena: राऊत, विचारेंसह चार खासदारांवर शिवसेना करणार कायदेशीर कारवाई; नेमकं काय घडलंय?

खासदार राहुल शेवाळे यांनी या कारवाईबाबत माहिती दिली आहे.
Rahul Shevale
Rahul Shevale
Updated on

Women's Reservation: संसदेचं विशेष अधिवेशन नुकतंच पार पडलं यावेळी अनेक वर्षांपासून रखडलेलं महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. पण लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे चार खासदार यावेळी लोकसभेत उपस्थित राहिले नाहीत.

यावरुन आता शिंदे गटानं या खासदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिंदे गटाचे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत माहिती दिली. (Women's Reservation Bill Shiv Sena to take legal action against four MPs including Vinayak Raut Rajan Vichare and others)

शिंदे गटानं काढला व्हिप

संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी शिंदे गटानं व्हिप काढला होता. यापार्श्वभूमीवर शेवाळे म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की, १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचं विशेष अधिवेशन होतं. या विशेष अधिवेशनाआधी १४ तारखेला शिवसेनेच्यावतीनं खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसाठी व्हिप काढला होता. व्हॉट्सअॅप, ईमेलद्वारे हा व्हिप देण्यात आला होता. (Latest Marathi News)

चार खासदार अनुपस्थित

यापूर्वी देखील आम्ही अविश्वास प्रस्तावावेळी देखील आम्ही व्हीप काढला होता. पण नारीशक्ती वंदन अधिनियम हे महत्वाचं विधेयक असताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यासाठी मतदान करता आलं. पण दुर्दैवानं आमचेच चार खासदार विनायक राऊत, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव हे विधेयक मांडलं जात असताना मतदानासाठी हजर राहिले नाहीत. शिवसेनेच्यादृष्टीनं ही दुर्देवाची बाब आहे की आमचेच चार सदस्य राहिले नाहीत. (Marathi Tajya Batmya)

Rahul Shevale
अजित पवार 'इन' अन् गोपीचंद पडळकर 'आऊट'; फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं?

कायदेशीर उत्तर मागणार

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालत असताना स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिला होता. त्यांची हीच भूमिका घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिला होता की, या विधेयकाला पाठिंबा दिला पाहिजे आणि मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहिलं पाहिजे.

पण हे चार सदस्य उपस्थित राहिले नसल्यानं हा महिलांचा अपमान आहे. कारण या सर्वांना महिलांनीच जास्त मतदान केलं होतं. त्यामुळं महिला आणि महाराष्ट्रातील जनता याचं त्यांच्याकडं उत्तर मागतील. तसेच आम्ही देखील त्यांच्याकडं कायदेशीर उत्तर मागू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.