Womens Reservation : मोदींना विश्वगुरू म्हणून आधीच मान्यता, आता...; राधाकृष्ण विखे पाटलांकडून कौतुक

Narendra Modi and radhakrishna vikhe patil
Narendra Modi and radhakrishna vikhe patil
Updated on

मुंबई : संसदेचे विशेष अधिवेशन संसद भवनात सुरू असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आलं. या विधेयकाचे विरोधकांनी देखील स्वागत केलं आहे. यावर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

Narendra Modi and radhakrishna vikhe patil
Womens Reservation : 'होय, हे आमचंच'; महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी यांचं विधान

विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस नव्या संसद भवनात सुरू झाला. या अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. हे ऐतिहासिक पाऊल विश्वगुरु म्हणून आधीच मान्यता मिळालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलल्याच विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Narendra Modi and radhakrishna vikhe patil
Maharashtra Breaking : राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची चर्चा याआधी अनेक अधिवेशनात होत होती. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहात महिलांचा सहभाग दिसतो. विकासात्मक कामालाही गती मिळाली. आता देशाचं आणि राज्याचं धोरण ठरविण्यात महिलांना तेहतीस टक्के वाटा मिळत असेल तर त्याच स्वागतच केलं पाहिजे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच अभिनंदनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.