नागपूर : रक्तदान (blood donation) हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानाचा महाराष्ट्राचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. रक्तदानाची चळवळ वाढावी यासाठी सर्वोतरी प्रयत्न होत आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे दरवर्षीपेक्षा यंदा रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळेच २०१९ च्या तुलनेत १ हजारांपेक्षा अधिक रक्तदान (world blood donor day) शिबिरे कमी झाल्याने यंदा २ लाख रक्तपिशव्यांची तूट होती. उपराजधानीत २७ हजार रक्तपिशव्यांची तूट आहे. (world blood donor day 2 lakh blood bags deficit due to corona in maharashtra)
अपघातात जखमी होणाऱ्यांपासून ते आनुवंशिक जनुकीय आजारांसह विविध शस्त्रक्रियेप्रसंगी लाखो रुग्णांना रक्ताची गरज भासते. रक्तासाठी गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर रक्तपेढ्यांचे जाळे तयार झाले. राज्यात सध्या सुमारे ३४७ रक्तपेढ्या आहेत. रक्तदान शिबिरांपासून तर विविध मार्गांनी रक्तसंकलन करण्यात येते. सर्वाधिक रक्तदान हे स्वेच्छा रक्तदात्यांकडून गोळा होते. कोरोनाचे संकट मार्च२०२० मध्ये राज्यात आले. जानेवारी २०२० मध्ये रक्तदान शिबिरांची संख्या २ हजार ७२४ होती. फेब्रुवारीतही २ हजार ६८९ रक्तदान शिबिरं राज्यात झाले. मात्र, मार्चपासून शिबिरांच्या संख्येत प्रचंड घट झाली असल्याचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या अहवालात नोंदी घेतल्या आहेत. २०२१ मध्ये मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवघे ९४६ रक्तदान शिबिर राज्यात झाले असून अवघे ६३ हजार ४२४ रक्तपिशव्या गोळा करता आल्या.
कोरोना काळात रक्तदान शिबिरांतील घट -
जानेवारी २०२० -२ हजार ७२४
फेब्रुवारी २०२० -२ हजार ६८९
मार्च २०२० -१ हजार९३७
एप्रिल २०२० - १ हजार १७६
मे २०२० -१ हजार ८१७
जुलै २०२० -१ हजार ४८९
राज्यात रक्तपिशव्यांचे संकलन, शिबिरांची संख्या -
वर्ष रक्तपिशव्या शिबिरांची संख्या
२०१८ - १६ लाख ५६ हजार - २८ हजार २२२
२०१९ - १७ लाख ५४ हजार - २७ हजार १९३
२०२० - १५ लाख ४६ हजार - २६ हजार १०४
मेडिकलमध्ये १० हजार रक्तपिशव्या
कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गरजूंना रक्त पुरवण्याचे आव्हाने पुढे ठाकले होते. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल)
रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, सामाजिक अधीक्षक डॉ. किशोर धर्माळे यांच्या मदतीने मेडिकलमधील रक्तदानातील तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला. कोरोनासंकटात ११७ रक्तदान शिबिरांतून १० हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६२ रक्तशिबिरांचे आयोजन केले असून ३ हजार ६०० रक्तपिशव्यांचे संकलन केले. विशेष असे की, सकाळ माध्यम समुहाने रक्तदान शिबिरासाठी केलेल्या आवाहनानंतर मेडिकल, मेयोत अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमानी शिबिर घेण्यासाठी पुढाकार घेतला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.