World Trible Day 2023: "प्रगती करणं म्हणजे..."; राज ठाकरेंनी ब्लॉगमधून सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा

राज ठाकरेंनी आजच्या जागतीक आदिवासी दिनानिमित्त एका दिवाळी अंकात लिहिलेला लेख ब्लॉग स्वरुपात शेअर केला आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबई : आजच्या जागतीक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेला एक ब्लॉग शेअर केला आहे. या ब्लॉगमधून त्यांनी आदिम संस्कृतीचा जागर करणं का गरजेचं आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

"प्रगती करणं म्हणजे निसर्गाचा बळी घेणं नाही" अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राज्यकर्त्यांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. तसेच जंगलं वाचवण्यासाठी राज्यकर्त्यांकडं काय व्हिजन असावं? याचा लेखाजोखाही त्यांनी मांडला आहे. (World Trible Day 2023 Raj Thackeray Blog)

राज ठाकरेंनी ब्लॉगमध्ये काय म्हटलंय?

सर डेव्हिड अटेन्बरो यांच्या ‘द इयर चेंज्ड द अर्थ’ या डॉक्युमेंट्रीच्या उल्लेखानं राज ठाकरेंनी आपल्या लेखाची सुरुवात केली आहे. या डॉक्युमेंट्रीत जगातील सर्व प्रमुख शहरांचं लॉकडाऊनमधील चित्रीकरण दाखवलं आहे. या काळात पृथ्वी एका वर्षात बदलली, असं त्यांनी म्हटलं आहे.

निसर्गाच्या इतक्या अवाढव्य खेळातील आपण एक अल्पसंख्यांक प्रजाती आहोत हे आपलं भान सुटलं आणि त्याची पहिली कुऱ्हाड पडली ती जंगलांवर. जगभरात कुठेही शहरीकरण सुरु झाल्यावर माणसं वाट्टेल तशी जंगलं तोडत गेली, ही जंगलं आणि त्यातली जैवविविधता अस्ताव्यस्त करत गेला, असं परखडपणे लिहिताना राज ठाकरेंनी भारतातील शहरीकरणावर भाष्य केलं आहे.

Raj Thackeray
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली, FIR होणार दाखल

मुंबईनंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड

भारतात शहरीकरण प्रचंड वेगाने होत गेलं आणि ते होतंय आणि त्यावर काही उपाय केला पाहिजे याचं भान कुठल्याचं शासनकर्त्यांना राहिलेलं नाही. देशातील मोजक्याच राज्यांनी लक्षणीय प्रगती केली आणि बाकीची राज्य ही यथातथाच प्रगती करत राहिली. मग या राज्यांमधून माणसांचे लोंढेच्या लोंढे या प्रगतीशील मोजक्या राज्यांकडे वळायला सुरुवात झाली. त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. वाढत्या माणसांच्या लोढ्यांना सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रात बेसुमार वृक्षतोड झाली.

मुंबईनंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड ही दिल्लीत झाली आहे. मुंबई असो की दिल्ली इथली वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणावर बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी झाली आहे आणि आता पुन्हा इथे जंगलं उभारणं हे जवळजवळ अशक्य आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. जगातील पहिली दहा शहरं जिथं सर्वाधिक जंगलं आहेत त्यामध्ये भारतातील एकाही शहराचं नाव नाही, अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. सिंगापूरसारखं छोटसं बेटही विकासाबरोबरच हिरवंगार आहे अस सांगताना आपल्या देशांत कुठल्याच राज्यात हे का दिसत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. आपल्याकडं चंदीगड हे एकमेव शहर आहे जे खूप वर्षांपूर्वी उभारलं गेलेलं नियोजित शहर आहे. ‘ल कार्ब्युझीयर’ सारखा फ्रेंच नगर रचनाकाराला मोकळ्या जागांच, उद्यानांच, वन उद्यानांचे महत्व कळलं होतं, म्हणून ते बहुदा एकमेव आखीव रेखीव शहर, बाकी सर्वत्र आनंदच आहे.

Raj Thackeray
Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणी हिंदू गटाला झटका! 'ही' याचिका हायकोर्टानं फेटाळली

मुंबई पालिकेचा उद्यान विभाग सगळ्यात दुर्लक्षित

मुंबईत मोकळ्या जागा झपाट्याने कमी होत आहेत, झाडं तोडली जात आहेत. महापालिकेचा उद्यान विभाग हा सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे. नवीन बागा तयार होत नाहीयेत. मुंबईत श्वासाशी संबंधित आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दिल्लीत तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लोकांना श्वास घेणं अशक्य होतं, इतकं प्रदूषण वाढतं. हे सगळं नक्की कुठे चाललं आहे? आपल्याला हे सगळं मान्य करायला एकतर भाग पाडलं जातंय किंवा आपल्याला कळतच नाहीये की ‘विकास’ या एका संकल्पनेखाली सगळं मातीत गेलं तरी चालेल हे भिनवल जातंय, अशा शब्दांत राज ठाकरेंनी एक प्रकारे विकासाच्या नावाखाली मोठंमोठ्या घोषणा करणाऱ्या सर्वच सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे.

Raj Thackeray
No-Confidence Motion: आम्हाला सत्ता नाही तर शांतता हवी! अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत काँग्रेसचे मोदींना 'हे' ३ सवाल

मुंबई शहर नशिबवान कारण....

२०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर करताना, मी ‘विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड हवी’ अशी भूमिका मांडणारी एक चित्रफीत बनवली होती. जी आज देखील युट्युबवर उपलब्ध आहे. त्यात मी वरचा मुद्दा मांडला होता. मुंबई हे इतकं नशीबवान शहर आहे की, ज्याला १०४ चौरस किलोमीटर पसरलेलं जंगल मिळालं आहे. नाहीतर आपल्याकडचं बोरिवलीतल नॅशनल पार्क हे एखाद्या युद्धाने बेचिराख झाल्यासारखं दिसतं. बरं, ही परिस्थिती फक्त मुंबईतच आहे असं नाही तर ती महाराष्ट्रात, देशात कुठेही जा कमी जास्त फरकाने तशीच आहे. अहो, आपल्या पुण्यात शिरताना पूर्वी किती हिरवंगार दिसायचं, आता सगळे खणलेले आणि ओकेबोके झालेले डोंगर बघून जीव तुटतो.

Raj Thackeray
Rahul Gandhi Birthday: स्वत:चे घरही नसलेल्या राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती?

विकासाला विरोध नाही पण....

विकासाला माझा विरोध नाही, तो व्हायलाच हवा, पण तो निसर्गाला ओरबाडून? रस्ते, मेट्रो, विमानतळं सगळं हवं, पण जर तिथे ऑक्सिजनची केंद्र म्हणजे जंगलंच नसतील तर करणार काय? आज हवामान बदलाने धुमाकूळ घातला आहे. काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या वाळवंटात, सगळं वाहून जावं इतका पाऊस पडला, भीषण उन्हाळा, आणि प्रचंड पाऊस हे नेहमीचं झालं आहे.

या दोन्हीत होणारं शेतीचं नुकसान, माणसांच्या आरोग्याचं नुकसान याचा विचार आपण करतोय का? आज तर अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर देशातील मोठ्या शहरांत राहत असाल तर तुम्हाला तुमच्या घरातल्या दुचाकी, चारचाकीच्या जोडीला प्रत्येक घरात एक होडी ठेवावी लागेल. बेंगळुरु ते दिल्ली ते मुंबई सगळीकडे हीच परिस्थिती आहे. चेन्नई दक्षिणेतील एक मोठं शहर, पण भीषण पाणीटंचाई असलेलं शहर. मुंबईसारख्या शहरातील खारफुटीवर आज अनेकांचा डोळा आहे. उद्या ही खारफुटी नसेल तर पाणी धरून कोण ठेवणार हा विचार आपल्याला शिवतच नाही.

Raj Thackeray
Marathi News Updates: जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

किमान इतकं झालं तरी उत्तम

आपल्याकडे या विषयाचं भान नाहीच असं मी म्हणणार नाही, आज आपल्या महाराष्ट्रात, ठाणे खाडीतल्या दलदलीच्या जमिनीला (वेटलँड) ‘रामसर’ साईटचा दर्जा घोषित झाला आहे. हा भाग फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अभयारण्य म्हणून घोषित झाला आहे. थोडक्यात इथे आता कुठलाही ‘विकास’ करताना इथल्या पर्यावरणाच्या चौकटीला धक्का लागणार नाही हे पाहिलं जाईल.

ठाणे खाडीच्या सोबतच, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तलाव परिसरातील भाग हा ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित झाला आहे. या तिन्ही स्थळांनी एकूण व्यापलेला भाग आहे ६५२२ हेक्टर्स. किमान इतकं झालं तरी उत्तम, अस राज ठाकरेंनी लिहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()