World Wildlife Day : भीमाशंकरचे बिबटे जुन्नरच्या ऊसात कसे?

बिबट्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्यात २००६नंतर बिबटे दिसणेच झालं दुर्मिळ
World Wildlife Day
World Wildlife Dayesakal
Updated on

Increasing Attacks Of Leopards In Maharashtra : महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे मानवी वस्तीत आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही ग्रामस्थ आंदोलनावर देखील उतरले. पण गवा असो किंवा बिबट्या असे वन्य जीव गाव, शहर, मानवी वस्तीकडे कसे वळतात? यामागे केवळ शहरीकरण एवढे एकच कारण आहे की, अजून काही हे जाणून घेण्यासाठी सकाळने निवृत्त वनअधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांच्याशी संवाद साधला.

कुकडोलकर हे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. वाघ, बिबट्या हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या परिस्थितीविषयी त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्रात बिबट्यांचा प्रश्न पहिले जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यातून सुरू झाला. २००१ मध्ये मोजणी केली तेव्हा ५ वर्षात बिबट्यांची संख्या दुप्पट झाल्याचे आढळले. भीमाशंकर अभयारण्यात १९८५-९० दरम्यान ८-१० बिबटे होते, २००६ नंतर एकही बिबट्या नाही. गेले कुठे? असा प्रश्न पडला. याचं कारण ते ऊसाच्या शेतात गेले.

बिबट्यांना वन सोडून का जावं लागलं याचं उत्तर शोधताना वन क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढला. खूप गाव वनांजवळ किंवा वनात आहेत. त्यामुळे वनांची प्रत कमी झाली आणि वन्यजीवांच्या गरजा भागेनास्या झाल्या. वन्यप्राण्याचे अधिवास माणसांमुळे नष्ट झाले. त्यांच्या गरजा भागवायला त्यांना बाहेर पडावे लागले.

World Wildlife Day
Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभागात १२७ जागांसाठी भरती, पदवीधारकांना सुवर्ण संधी

अन्न, पाणी, सुरक्षित निवारा, जोडिदार, पिल्लांसाठी सुरक्षित निवारा या त्यांच्या मुख्य गरजा. त्यात वनात भागल्या नाहीत. बिबट्या हुशार प्राणी आहे. त्याने जेव्हा वनात गरजा भागत नाही म्हटलं तेव्हा अधीवासासाठी उसाच्या शेतीचा आधार घेतला. तिथे त्याला सुरक्षित निवारा मिळाला. भीमाशंकरचे बिबटे ऊसाच्या शेतीत येऊन वसले.

असे लक्षात आले आहे की, गरजा भागल्या की, प्रजनन फार मोठ्या प्रमाणात होतं. जिथे २-३ पिल्लं होत तिथे आता ३-५ पिल्लं व्हायला लागली. २००१ पासून हे प्रमाण वाढलं. तिथं त्यांना पुरेसे अन्नही मिळाले. उंदीर, घुशी, गाव जवळ असल्याने कुत्री, कोंबड्या, बकऱ्या, पाळीव जनावरं असा भरपूर अन्न पण मिळालं. काही प्रमाणात माणसंपण मारली.

World Wildlife Day
Forest Recruitment : वनविभागात मोठी पदभरती

पहिले ५-६ महिने ऊसाचा शेतकरी शेतात जातो. पण नंतर ऊस बांधल्यावर कोणी तिकडे फिरकतपण नाही. फक्त पाणी सोडलं जातं. त्यामुळे बिबट्यांना पूर्ण सुरक्षितता मिळते. त्यामुळे त्यांचा निवारा, पाणी, अन्नाचा प्रश्न सुटला. प्रत्येक वाघ आणि बिबट्याला स्वतःचं क्षेत्र लागतं.

संख्या नियंत्रणात कशी आणणार?

प्रभाकर कुकडोलकर सांगतात, बिबट्यांच्या संख्येचे नियंत्रण करायला हवं. नसबंदी करू असं नुसतं म्हटलं जातं. पण अंमलबजावणी करत नाही. शक्य असलं तरी त्यासंदर्भात संशोधन करणं आवश्यक, नर मादी प्रमाण काय असायला हवं, त्यावरुन निर्णय होऊ शकेल. डेहराडून मध्ये संशोधन सुरू आहे. त्यातून येणाऱ्या माहितीच्या आधारे नियोजन करणं शक्य होईल.

World Wildlife Day
World Wildlife Day 2024 : वन्यजीवांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात आहेत हे सहा राष्ट्रीय उद्याने...

वन्यजीव धोरणाची आवश्यकता

  • वन धोरण २००८ साली निश्चित केलं होतं. वन विभागाच्या तुलनेत वनजीव विभागाकडे फार कमी क्षेत्र आहे. मानव वन्यप्राणी संघर्ष वाढत चाललं आहे.

  • त्यामुळे स्वतंत्र वन्यजीव धोरण आखण्याची गरज आहे. पण ते नाही म्हणून प्रॉब्लेम येतोय.

  • वन अधिकाऱ्यांना ठोस कारवाई करण्याची अडचण येत आहे.

  • बिबटे वाढू द्यावेत का? किती वाढू द्यावेत, पिंजरा लावावा की नाही असं कोणतंही ठोस धोरण नाही.

  • हल्ली पॉलिटेकल प्रेशरवर निर्णय घेतले जात आहेत.

लोकांचा पुढाकार आवश्यक

  • वन्यजीवांचे हल्ले झाल्यावर काय काळजी घ्यावी याविषयी लोकांना जागृत करणं फार आवश्यक आहे.

  • तसे प्रयत्न वनविभागाकडून केले जातात, पण सरकारी पातळीवर मोठ्याप्रमाणात प्रयत्न होणं आवश्यक आहे.

  • हल्ला होऊ नये किंवा झाला तर लोकांनी काय करावं या विषयी जनजागृती करण्यापेक्षा वनविभागाला प्रेशराइज्ड केलं जात आहे.

  • लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन काही गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे.

  • शेतात जाताना आवाज करत जा, एकटे-दुकटे जाऊ नका, मुखवटे, लोखंडीपट्ट्यांचा वापर इत्यादी असे सावधगीरीचे उपाय स्वतः अंमलात आणायला हवेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.