Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना 'वरळी' जड जाणार? आखाड्यात शिंदेंचा शिलेदार उतरणार?

कोण सत्तेत येणार? कोणाची युती होणार? सत्तेचे समीकरण जाणून घ्या
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

महाराष्ट्रात सध्या काय सुरु आहे, असा प्रश्न कोणी विचारला तर आपसुकच राजकारण हा शब्द तोंडातुन निघेल. सध्या विधानभा, लोकसभा निवडणूकांचे वारं वाहतायेत आणि या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं, बंडाचं, बदलत राजकारण सामोरं येतय. ज्यामुळे नेत्यांपासुन पक्षापर्यंत अगदी कार्यकर्त्यांची सुद्धा गोची झालीये.(Latest Marathi News)

त्यामुळे कोण सत्तेत येणार? कोणाची युती होणार? कोण मुख्यमंत्री होणार? कोणाला फटका बसणार? कोणाची समीकरण पहायला मिळु शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी सकाळ माध्यम समुह तुमच्यासाठी घेऊन आलयं एकदम ओरीजीनल सीरीज राजकारणाचा आखाडा, ज्यात प्रत्येत नेता.... त्याचा मतदारसंघ... आणि त्याच्या विरोधातले कसलेले पैलवान.. या सगळ्यांची सविस्तर मांडणी..चला तर मग सुरुवात करूयात... बंडाचा सगळ्यात मोठा फटका बसलेल्या शिवसेनेपासुन आणि त्यात युवराज आदित्य ठाकरे यांच्यापासुन...(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Uddhav Thackeray: शिंदे गटातील १२ आमदारांचा उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्लॅन फसला, मातोश्रीवर फोन केला पण...

ठाकरे घराणं महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव.. म्हणजे असं म्हणतात. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते. तेव्हा सत्ता असो किंवा नसो पण राजकारणाचे, सत्तेचे केंद्र हे मातोश्री असायचं. शिवसैनिक या नावाने आजही विरोधकांची भंबेरी उडते. याच मातोश्रीने अनेक तगडे नेते आपल्या महाराष्ट्राला दिले. त्यातलचं सध्याच मोठ नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Raj Thackrey: भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर चालतं पण मी बोललो तर देशविरोधी? राज ठाकरेंची टीका

ठाकरेंनी अनेकांना निवडणूकीच्या आखाडाच उतरवलं.... आमदार, खासदार मंत्री बनवलं. पण बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी राजकारणात येण्याची संधी दिली पण स्वतः कधीही निवडणूक लढले नाहीत. ठाकरे घराण्याची एकंदरीत परंपरांच म्हणता येईल.

पण ठाकरे घराण्याची हीच परंपरा मोडीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली ती युवराज आदित्य ठाकरे यांनी, आणि ती सुरुवात केली शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वरळी मतदार संघातून...आता ज्याप्रमाणं गेली २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्याचप्रमाणे वरळीतही गेली कित्येत वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. या मतदारसंघाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर १९६२ ते १९७२ या दरम्यान इथे काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर १९७२ ते १९७८ कम्यूनिस्ट पक्षाची या दरम्यान १९८० ला पुन्हा काँग्रेसचे आमदार शरद दिघे निवडणून आले. यानंतर १९८५ ला विनीता सामंत या अपक्ष निवडणून आल्या.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
MNS Raj Thackeray : मनसेमध्ये चक्क पंजाबी तालुक्याध्यक्ष! राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेले सरदार कोण?

पण त्यानंतर १९९० ते आजतागायत तिथे शिवसेनेचा आमदार आहे. फक्त मधला २००९ चा काळ सोडला तर म्हणजे १९९० ला दत्ताजी नलावडे हे शिवसेनेचे आमदार निवडून आले. ते सलग ४ वेळा म्हणजे १९९५, १९९९, २००४ ला आमदार होते. त्यानंतर मात्र २००९ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर हे निवडूण आले पण सध्या सचिन अहिर हे शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटात आहेत. त्यानंतर २०१४ ला पुन्हा वरळीतल्या जनतेनं शिवसेना आमदार सुनील शिंदे यांना निवडणून दिलं. आणि आता २०१९ ला अदित्य ठाकरे याच मतदारसंघातून निवडणून आले.

एकूण काय १९९० पासुन वरळीत शिवसेनेचा दबदबा राहिलाय. त्यात याच मतदारसंघात किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे, आशिष चेंबुरकर यांच्यासारखे नेते आहेत. अरविंद सावंत हे खासदार आहेत आणि त्यात सचिन अहिर सुद्धा जोडले गेलेत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला आणखीनच मजबुत झालाय.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Raj Thackrey: 'मी तुला दिसलो का गाडीमध्ये झोपलेलो..', राज ठाकरेंची अजित पवारांच्या स्टाईलमध्ये मिमीक्री

त्यामुळे २०१९ ला आदित्य ठाकरेंसाठी वरळी काबीज करणं अवघडं नव्हतं. मार्ग सोपा होता. आणि महत्वाचं म्हणजे ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात उतरत असल्याने बालेकिल्ला देणं भाग होतं. त्यामुळे वरळी मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंसाठी अगदी सोपा पेपर. आणि तसचं घडलही. आदित्य ठाकरेंना ८९२४८ मतं मिळाली.

राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना २१८२१ मतं होती. म्हणजे आदित्य ठाकरेंना ६७ हजारांपेक्षा जास्त मतं होती. पण, न विसरता येणारी गोष्ट म्हणजे या वरळी मतदारसंघातील ६५०० जनतेनं नोटाचा पर्याय निवडला होता. त्यात आता शिवसेनेत बंड झालं. आता जरी इथल्या कुठल्या बड्या नेत्यानं शिंदे गटाची किंवा दूसरी कुठली वाट पकडली नसली तरी आदित्य ठाकरेंना ऐन निवडणूकीवेळी टक्कर मिळु शकते.

Maharashtra Politics
Pune NCP : कार्यकर्त्यांना निवडावे लागणार शरद पवार किंवा अजित पवार? शरद पवार गटाचं महत्त्वाचं पाऊल

कारण शिवसेनेतलाच एक गट आणि आधीच्या निवडणूकांमध्ये पाठिंबा मिळालेली भाजपा यंदाच्या निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभी आहे. सध्या तरी कुठला तगडा उमेदवार या मतदारसंघात ना शिंदेंकडे नाहीये ना भाजपाकडे, पण जसं की आगामी निवडणूकांसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरलाय की ठाकरेंच्या उमेदरावा विरोधात शिंदे गटाचा उमेदवार तसेच चित्र वरळीतही पहायला मिळू शकतं.(Latest Marathi News)

शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने भाजप तिथे रिस्क घेणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिदेंचाच शिलेदार वरळीत उभा राहू शकतो. त्यात भाजप आणि शिंदेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटचाही त्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मिळू शकतो. आणि आदित्य ठाकरेंसाठी हा सोपा पेपर अवघड जाऊ शकतो. त्यामुळे आगामी चित्र हे निवडणूकांवेळीच स्पष्ट होईल.

Maharashtra Politics
Crime News: धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.