अविवाहित तरूणांची चिंता मिटणार! नकोशी नव्हे ‘ती’ हवीशी; सोलापूर जिल्ह्यात १००० मुलांमागे ९२४ मुली, सांगोल्यात मुलींचा सर्वाधिक जन्म

एप्रिल-सप्टेंबर या काळात ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण एक हजार मुलांमागे ९२४ मुली असे आहे. करमाळा, माळशिरस, मोहोळ तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असून सांगोल्यात सर्वाधिक मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर !
जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर !Canva
Updated on

सोलापूर : एप्रिल ते सप्टेंबर या काळात ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण एक हजार मुलांमागे ९२४ मुली असे आहे. करमाळा, माळशिरस, मोहोळ तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असून सांगोल्यात सर्वाधिक मुलींचा जन्म झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.

‘मुलगा हाच वंशाचा दिवा’ ही समजूत आता कमी झाली आहे. आई-वडील शिकले आणि मुलगा व मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. मुलांच्या बरोबरीने मुलीही विविध क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. राजकीय क्षेत्रातही मुलींचा ५० टक्के सहभाग आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून शालेय शिक्षणावेळी शिष्यवृत्ती योजना आणि गर्भवती मातांसाठी देखील काही योजनांचा लाभ दिला जातो. त्यातून हा जन्मदर वाढण्यास मोठी मदत झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तरुणांनी विवाहासाठी मुलगी मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, या आर्थिक वर्षातील स्थिती सुधारली असून गतवर्षी मुलींचा जन्मदर (एक हजार मुलांमागे) ९०७ पर्यंत होता. आता तो वाढला आहे. विशेष बाब म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यात सहा हजार ३५३ पालकांनी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे.

एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतची स्थिती

  • तालुका (प्रकल्प) ० ते ६ वर्षे (मुले) ० ते ६ वर्षे (मुली)

  • अक्कलकोट १०,९७३ १०,४२७

  • बार्शी ४,६२७ ४,०००

  • वैराग ५,१४५ ४,७९४

  • करमाळा ९,४७८ ८,४२५

  • माढा ६,३६० ७,३६३

  • कुर्डुवाडी, टेंभुर्णी ६,७०२ ५,९९९

  • माळशिरस १४,८०८ १३,११२

  • अकलूज ७,९२४ ७,०७३

  • मंगळवेढा ९,०१५ ८,२९३

  • मोहोळ ११,६६५ १०,५२०

  • उत्तर सोलापूर ५,६२० ५,२९२

  • पंढरपूर-१ १०,३३३ ९,३१९

  • पंढरपूर-२ ६,६७४ ६,१८३

  • सांगोला ७,३१९ ७,०३३

  • कोळा ६,११२ ५,६५०

  • द.सोलापूर १०,५९२ ९,७१५

  • एकूण १,३३,३४७ १,२३,१९८

‘लेक लाडकी’मुळे मुली वाढण्याची आशा

राज्य सरकारने मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह थांबावेत या प्रमुख हेतूने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या दोन मुलींना लाभ मिळणार आहे. मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सातवीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एकूण एक लाख रुपये तिला दिले जाणार आहेत.

‘या’ प्रकल्पाअंतर्गत अधिक कामाची गरज

जिल्ह्यातील १६ प्रकल्पाअंतर्गत आरोग्य विभागाकडून मुलींचा जन्मदर नोंदविला जातो. त्यातील बार्शी, करमाळा, कुर्डुवाडी-टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मोहोळ, पंढरपूर-१, दक्षिण सोलापूर या प्रकल्पाअंतर्गत अधिक काम करावे लागेल, अशी स्थिती आहे. त्याठिकाणी एक हजार मुलांमागे ८८५ ते ९१७ मुली, असे प्रमाण आहे. उर्वरित आठ प्रकल्पाअंतर्गत मुलींचा जन्मदर ९२४ ते ९५० पर्यंत आहे.

पालकांनी मुलगा-मुलगी भेदभाव करू नये

सुकन्या व लेक लाडकी योजनांचा अनेकांना लाभ होत असून त्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. दुसरीकडे गर्भलिंग निदान चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यादृष्टीने नियोजन आहे. पालकांनीही मुलगा-मुलगी भेदभाव करू नये. दोघेही आता शिकून सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.

- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.