High Court : बसवर 'जय महाराष्ट्र' लिहिणे गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, ॲड. येळ्ळूरकरांना खटल्यातून वगळले

Maharashtra Government : ‘जय महाराष्ट्र’ म्हणत भाषिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
Maharashtra Transport Board
Maharashtra Transport Boardesakal
Updated on
Summary

बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिल्यामुळे आणि म्हटल्याने भाषिक तेढ निर्माण होत नाही, असे सांगत यावेळी न्यायालयाने येळ्ळूरकर यांना या गुन्ह्यातून वगळण्याची सूचना केली.

बेळगाव : ‘जय महाराष्ट्र’ (Jai Maharashtra) असे लिहिलेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या (Maharashtra Transport Board) बसचे स्वागत केल्याप्रकरणी ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्यावर मार्केट पोलिस स्थानकात पुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, उच्च न्यायालयाने (High Court) जय महाराष्ट्र म्हणणे गुन्हा नाही, तसेच ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने भाषिक तेढ निर्माण होत नाही, असे सांगत येळ्ळूरकर यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.

दोन जून २०१७ रोजी रात्री दहा वाजता महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) बसचे मध्यवर्ती बस स्थानकावर ॲड. येळ्ळूरकर, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, मदन बामणे, गणेश दड्डीकर, मेघन लंघरकांडे, सूरज कणबरकर यांनी स्वागत केले होते. त्यानंतर मार्केट पोलिसांनी येळ्ळूरकर यांच्यासह इतरांवर गुन्हा क्रमांक १९१/२०१७ अंतर्गत सेक्शन क्रमांक १४३, १४३ (१५३ ए) सह कलम १४९ आयपीसीनुसार गुन्हा दाखल केला होता.

Maharashtra Transport Board
Hasan Mushrif : 'वर्षभरात केशवराव भोसले नाट्यगृह जसेच्या तसे उभारणार'; पालकमंत्री मुश्रीफांची ग्वाही

तसेच ‘जय महाराष्ट्र’ म्हणत भाषिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याबाबत सहा वर्षांपासून न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, पुराव्यांअभावी अनेक दिवस याबाबत सुनावणी सुरूच राहिल्यामुळे ॲड. राम घोरपडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ॲड. येळ्ळूरकर यांच्यावरील खटला रद्द करावा, अशी मागणी केली होती.

याबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिल्यामुळे आणि म्हटल्याने भाषिक तेढ निर्माण होत नाही, असे सांगत यावेळी न्यायालयाने येळ्ळूरकर यांना या गुन्ह्यातून वगळण्याची सूचना केली. न्यायालयाने येळ्ळूरकर यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची सूचना केल्यानंतर आता इतर कार्यकर्त्यांच्या वतीनेही अशीच याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती दिली आहे.

Maharashtra Transport Board
UCO Bank : दोघा भावांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर युको बँकेला ठोठावला तब्बल कोट्यवधींचा दंड; काय आहे प्रकरण?

कोणतेही कारण नसताना मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे मराठी भाषिकांना विनाकारण न्यायालयात जावे लागते. त्यामुळे अनेकांची अडचण होत आहे. दरवेळी खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिस तोंडघशी पडतात व कार्यकर्ते निर्दोष सुटतात. त्यामुळे प्रशासनाने यापुढे शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत.

-ॲड. अमर येळ्ळूरकर

खटल्यातून ४० जणांना वगळणार?

धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याप्रकरणी राज्यद्रोह व अन्य कलमानुसार गुन्हे दाखल केलेल्या ५० पैकी ४० जणांना या खटल्यातून वगळण्याची सूचना उच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळेही अनेक कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्यानंतर कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले होते. मात्र, नोंदवलेले गुन्हे खोटे असून, या खटल्यातून संशयितांना वगळण्याची मागणी ॲड. राम घोरपडे व ॲड. पल्लवी पालेकर यांनी याचिकेद्वारे केली होती. त्याचा विचार करून न्यायालयाने ४० जणांना राज्यद्रोहाच्या गुन्ह्यातून वगळण्याची सूचना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.