Accident News : पंजाब येथील भाविकांवर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू : नागपूर-तुळजापूर महामार्गावर कळंबनजीक अपघात

यवतमाळ-नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. एका ट्रकला भाविकांची इनोव्हा कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
Accident News : पंजाब येथील भाविकांवर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू : नागपूर-तुळजापूर महामार्गावर कळंबनजीक अपघात
Updated on

यवतमाळ, ता. 1 : पंजाबवरुन नांदेड येथे गुरुव्दारादर्शनासाठी जात असताना कळंब तालुक्यातील चापर्डा गावानजीक भाविकांवर काळाने घाला घातला. कारने ट्रकला धडक दिल्याने अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.एक) पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली.

अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. सर्वजण राहणारे पंजाबचे असून मृतांमध्ये तजेंद्रसिंग परविंदर सिंग, बलवीर कौर, भजन कौर, चालक सुराजसिंग यांचा समावेश आहे. जसप्रीत नहाल गंभीर जखमी असून त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

Accident News : पंजाब येथील भाविकांवर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू : नागपूर-तुळजापूर महामार्गावर कळंबनजीक अपघात
NEET Result: देशभरात झालेल्या गोंधळानंतर, पुन्हा घेतलेल्या NEET परीक्षेचा निकाल जाहीर

पंजाब येथील शीख कुटुंब दर्शनाला पीबी 11 सीबी 4963 क्रंमाकांच्या कारने नांदेड येथे जात होते. चापर्डा गावानजीक ट्रक क्रंमाक एमएच 32 एजे 7772 हा रस्त्याच्या कडेला उभा होता. कारने ट्रक ला मागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडी ट्रकच्या मागच्या भागात अडकली. चारचाकी वाहनात असलेल्या एअर बॅग्ज च्या चिंधड्या झाल्या. या अपघातातील पाचही जण पंजाब राज्यातील रहिवासी असून त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस ठाणेदार दिपमाला भेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी गावकर्‍यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातातील गंभीर जखमी असलेल्या जसप्रीत नहाल यांना उपचारार्थ यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. रात्रभर प्रवास केल्याने चालकाला झोप लागली असून त्यातून हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी घटनास्थळी भेटून देवून पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.