Exam : परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत पेपर सोडवणारी 'हिरकणी'; महाविद्यालयाने बाळासाठी...

exam motivation: परीक्षा खोलीत बाळाला सांभाळायला कोणी नव्हते. मात्र, तिची जिद्द पाहून पर्यवेक्षक प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थिनी मदतीला धावून आलेत.
exam motivation
exam motivation
Updated on

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्यातील जंगल भागातील बेलगव्हाण येथील शीतल राठोड या विवाहितेने गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह बीए अंतिम वर्षाची परीक्षा दिली.

परीक्षा खोलीत बाळाला सांभाळायला कोणी नव्हते. मात्र, तिची जिद्द पाहून पर्यवेक्षक प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थिनी मदतीला धावून आलेत. कर्तृत्व निर्माण करताना मातृत्वाचीच खरेतर परीक्षा होत असते....होय ना!

exam motivation
CBSE Result : 'कोविड बॅच’ची घसरण! सीबीएसईचा बारावीचा निकाल ५ टक्क्यांनी खाली

शीतल राठोड या परीक्षार्थी तरुणीचा आज गुरुवारी (ता.११) सकाळी नऊ ते बारादरम्यान गृहअर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. लग्नानंतर लगेच बाळ जन्माला आल्याने ती बीए अंतिम वर्षाचा गृहअर्थशास्त्राचा पेपर देऊ शकली नव्हती. तथापि, पदवी मिळविण्याची तिची जिद्द कायम होती.

सहा महिन्यांचे बाळ असताना तिने परीक्षेची तयारी केली. बाळ सांभाळायला तिच्यासोबत कोणी नव्हते, तरीही ती ऑटो रिक्षात बसून परीक्षा केंद्रावर आली. (Latest Marathi News)

तिच्या वर्गावर प्रा. धनंजय काठोळे पर्यवेक्षक होते. त्यांनी परीक्षेदरम्यान बाळ कसे सांभाळणार? असा तिला प्रश्न केला असता, तिने स्वतः सोबत आणलेला कापड परीक्षा खोलीत पसरविला. ती पेपर घाईघाईत सोडवू लागली. मात्र, तिचे लक्ष बाळाकडेच होते. (Marathi Tajya Batmya)

exam motivation
Ajit Pawar : 'अजित पवार खोटं बोलत आहेत', नाना पटोलेंचा थेट पलटवार

त्यातच भुकेने व्याकूळ बाळाने टाहो फोडला. अशावेळी प्रा. काठोळे यांनी संवेदनशीलता जपत बाळाला हातात सावरले. काही वेळानंतर परीक्षेचे काम करण्यास व्यत्यय येत असल्याने त्यांनी महाविद्यालयातील बीएसडब्ल्यूच्या विद्यार्थिनींना सहकार्यासाठी सोबत घेतले.

परीक्षा खोलीत विद्यार्थिनीच असल्याने या परीक्षार्थी मातेने तान्हुल्यास दोनदा स्तनपान केले. तिच्या या जिद्दीला परीक्षा खोलीतील विद्यार्थिनींनीही सलाम केला.

"दरवर्षी परीक्षा केंद्रावर चिमुकल्या बाळांसोबत तरुणी परीक्षेसाठी येतात. परंतु, त्यांच्यासोबत कुणीतरी पालक माता असते. शीतल मात्र, एकटीच बाळाला घेऊन परीक्षा केंद्रावर आली. बाळाला खाली टाकून पेपर सोडवू लागली. तिची जिद्द पाहून मनात ऊर्जा दाटून आली. त्यांच्या जिद्दीला साथ देण्यासाठी महाविद्यालयाने आता तयारी केली आहे. महाविद्यालयाच्या खोलीत बाळांसाठी साडीचा पाळणा बांधला आहे."

- प्रा. धनंजय काठोळे, गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद (जि. यवतमाळ)

‘जिद्द तुमची, साथ आमची‘ हे ब्रीदवाक्य घेऊन महाविद्यालय महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. विद्यापीठस्तरीय परीक्षा केंद्रावर अशा बाळांची व्यवस्था करून महाविद्यालयीन शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या महिलांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्यासाठी ‘जिद्द तुमची, साथ आमची‘ हा उपक्रम महाविद्यालय राबविणार आहे.

- प्रा. भालचंद्र देशमुख, गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.