Vidarbha Rain Update : यवतमाळपाठोपाठ बुलढाण्यात पावसाचा कहर; 120 नागरिक अडकले

Yavatmal Rain
Yavatmal Rain esakal
Updated on

Buldhana Rain News : मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन झालेलं असून अंदाजापेक्षा जास्त पाऊस कोसळत आहे. यवतमामळमध्ये ४५ जण अडकलेले असतांना आता बुलढाण्याच्या काथर गावात १२० नागरिक अडकलेले आहेत.

बुलढाण्यातील काथर गावात १२० जण अडकल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. पांडव नदीला पूर आल्यामुळे १२० नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे.

Yavatmal Rain
Vidarbha Flood News : यवतमाळमधील पुरात 45 जण अडकले! फडणवीसांनी पाठविली मदत; लष्कराचे हेलीकॉप्टर पोचणार

दुसरीकडे यवतमाळमध्ये ४५ जण अडकले असून भारतीय हवाई दल रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे. नुकतंच बुधवारी रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

Yavatmal Rain
Oppenheimer Day 1 Collection: बॉलिवूड अन् टॉलिवूड राहिलं बाजूला! हॉलिवूडच्या ‘ओपनहायमर’नं पहिल्याचं दिवशी कमावले इतके कोटी...

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात यआली आहे. पावसाची शक्यता असलेले जिल्हे : उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया या जिल्हात देखील पाऊस होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.