Vijay Wadettiwar: 'काल अब्दुल सत्तार अन् आज सुनील कांबळेंनी दाखवला सत्तेचा माज', महायुतीवर विरोधकांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar: पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात एका पोलिस आधिकाऱ्यासह राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली होती.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarEsakal
Updated on

पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात एका पोलिस कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांला कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काल अब्दुल सत्तार...आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज ... भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो...'.

Vijay Wadettiwar
Sunil Kamble: आमदार सुनील कांबळेंना झालंय काय? आधी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात, नंतर ड्युटीवरच्या पोलिसाला मारहाण

सुनील कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला केली मारहाण

सुनील कांबळे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती. उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले असे विचारत त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली होती. राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती.

अजित पवार यांच्या उपस्थितीत जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा कांबळे हे मंचावरून खाली उतरत असताना त्यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना कानाखाली लगावली. पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचे काम करत असताना कांबळे यांना अचानक राग अनावर झाला, त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. भाजप नेत्याच्या या वर्तणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar: अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर लाठीजार्च करण्याचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. छत्रपती संभाजी नगरमधल्या सिल्लोड येथे बुधवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी गोंधळ घालून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा गोंधळ वाढल्यानंतर काहीवेळ कार्यक्रम थांबवावा लागला.

त्यानंतर संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंचावर येत तरुणांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तरीही त्यांचा अतिउत्साह थांबायचं नाव घेत नव्हता. शेवटी सत्तारांनी पोलिसांना आवाहन करत लाठीजार्ज करा असं म्हटलं. हे बोलताना त्यांनी चुकीचा शब्दप्रयोग केला.

अब्दुल सत्तार पोलिसांना सूचना देताना म्हणाले की, यांना कुत्र्यासारखं मारा.. १ हजार पोलिसांना ५० हजार लोकांना मारायला काय लागतं. यांच्या XXX हड्डी तुटली पाहिजे. गोंधळ घालणाऱ्यांना जेलमध्ये टाका, असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. त्यांनंतर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केला.

Vijay Wadettiwar
Pune Metro : मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात दोन हजार कोटी रुपयांच्या वाढीस राज्य सरकारकडून मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.