Tribal Day : योगिताच्या पीएचडीला राज्य सरकारचे बळ ; अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून खडतर परिस्थितीत आश्रमशाळेत शिक्षण घेतलेल्या योगिता वरखडेला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून एक कोटी ६२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
Tribal Day
Tribal Day sakal
Updated on

आदिवासी दिन विशेष

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून खडतर परिस्थितीत आश्रमशाळेत शिक्षण घेतलेल्या योगिता वरखडेला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून एक कोटी ६२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. आजवर विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मात्र, हा लाभ केवळ पदव्युत्तर पदवीपर्यंत मर्यादित होता. मात्र, पीएचडीसाठी शिष्यवृत्ती घेणारी योगिता ही पहिलीच कन्या. देशातील उच्च शिक्षणासाठी मिळणारी ही शिष्यवृत्ती योगिताच्या रूपाने प्रथमच विदेशातील शिक्षणासाठी मिळाल्याने आदिवासी मुलींसाठी ही घटना प्रेरणादायी आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव या छोट्याशा खेड्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात योगिताचा जन्म झाला. आई आश्रमशाळेत शिक्षिका असल्याने कुटुंबात शिक्षणाचे महत्त्व होते. मात्र, कुंटुबात चार बहिणी, यातही योगिता सर्वांत लहान. आर्थिक परिस्थिती जेमतेम, अंधश्रद्धेने ग्रासलेले गाव, शिक्षणाचा व वाहतुकीच्या सुविधांचा अभाव, वीज पुरवठा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही योगिताने कारवाल शासकीय आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, गडचिरोलीतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी नागपूरची वाट धरली. गाव-खेड्यातून आलेली असल्याने प्रत्येक पावलावर अडचणी आल्या. परंतु, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असल्याने प्रत्येक संकटावर मात करत तिने शासकीय विज्ञान संस्थेतून बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठात मॉल्युकिलर बायोजेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये एमएसस्सीचे शिक्षण सुरू केले.

हे शिक्षण पूर्ण करत असतानाच अमेरिकेत पीएचडी करत असलेल्या चुलत भावाने तिला पीएचडीसाठी अमेरिकेत येण्याचे सुचविले. मात्र, भारत ते अमेरिका हा प्रवास सोपा नव्हता. घरात तीन बहिणींचे शिक्षण सुरू होते. या परिस्थितीत अमेरिकेत शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा करायचा? हा यक्षप्रश्न उभा राहिला. याच दरम्यान, तिला आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर, योगिताने आदिवासी विभागात अर्ज करत पाठपुरावा केला. काही दिवसांनी तिला शिष्यवृत्तीचा मेल प्राप्त झाला. अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील मिशिगन टेक्नोलॉजिकल युर्निव्हर्सिटीत योगिताचा प्रवेश निश्चित झाला आहे. ती १५ ऑगस्ट २०१९ रोजी शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाली. आदिवासी विभागाकडून तिला १ कोटी ६२ लाख १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. सध्या योगिता आता पीएचडीच्या अंतिम वर्षात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एका गावातून अमेरिकेपर्यंतचा प्रवास अवघड होता. मात्र, प्रत्येक संकटावर मात करत, ध्येय गाठले. आदिवासी विकास विभागातील शिष्यवृत्तीने माझी स्वप्नपूर्ती झाली. पीएचडीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, गावात येऊन माझ्या लोकांसाठी काम करायचे आहे.

- योगिता वरखडे, विद्यार्थिनी

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक योजना आहेत. परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत योगिता वरखडे अमेरिकेत जाऊन पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या योजनेतून अनेकांना संधी मिळू शकते. शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागाचे प्रयत्न आहे.

- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.