MLA Disqualification Case:
MLA Disqualification Case: Esakal

MLA Disqualification Case: "तुमच्यामुळं उशीर होईल, मला हे सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल" नार्वेकरांनी का दिला वकिलांना इशारा?

शिवसेना आमदार अपात्रतेवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडत आहे.
Published on

शिवसेना आमदार अपात्रतेवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. या प्रश्नांना सुनील प्रभू यांनीही शिताफीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आजही तोच काहीसा प्रकार दिसून आला आहे

२१ तारखेला सुरू झालेल्या या सुनावणीपासून जेठमलानी आणि सुनील प्रभू यांच्यात खंडाजंगी दिसून आली. पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेच्या मुद्द्यावरुन त्यानंतर काल(बुधवारी) व्हिपवरुन या दोघांमध्ये चांगलीच जुंपली. तर आज तिसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील कामत यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले.

MLA Disqualification Case:
Aditya Thackeray News : 31 तारखेपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरेंचा दावा

दरम्यान आजही शिंदे गटाचे वकिल आणि ठाकरे गटाच्या वकिल यांच्यात मध्ये 'तू-तू मैं-मैं' झाल्याचे दिसून आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोघांना समज दिला आहे. तुमच्यामुळं सुनावणीला उशीर होईल, मला हे सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल, असं अध्यक्षांनी म्हटलं आहे.

तुमच्या वादाचा परिणाम वेळकाढूपणामध्ये होत आहे. हे मी रेकॉर्डमध्ये नोंद करतोय. मला ठराविक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे असंही विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही पक्षकार वकील युक्तीवाद करताना विनाकरण वाद करत आहे यामुळे वेळ वाया जातो असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.


MLA Disqualification Case:
Chhagan Bhujbal : "छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर"; जरांगेंचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.