कृषी अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभाराला कंटाळून कृषी पदवीधर तरूणाने घेतले विष

फळबाग लागवड योजनेचे बिल मिळण्यास त्रास दिला जात असल्याने उचलले टोकाचे पाऊल
Farmer Sucide
Farmer Sucide esakal
Updated on

औसा : कृषी पदवी टॉप रँकमध्ये घेऊन शेती करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याला फळबाग लागवडीचे बिल येथील कृषी विभागातील 'शुक्राचार्य' मिळू देत नसल्याने या शेतकऱ्याने सोमवारी (ता.२७) दुपारी येथील कृषी कार्यालयातच विषारी कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भागवत उत्तम सगर (वय २५) रा. एकंबीवाडी असे या तरुणाने नाव आहे. त्याला तातडीने लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Farmer Sucide
डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे फळबाग लागवडीसाठी औसा पॅटर्न तयार करून राज्याला एक वेगळी दिशा देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकंबीवाडी ता. औसा येथील तरुण शेतकरी भागवत सगर यांनी आपली आई सुमनबाई उत्तम सगर यांच्या नावे असलेल्या अडीच एकरात तर चुलत भाऊ व स्वतःच्या शेतात बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी अर्ज केला. त्याला मंजुरी ही मिळाली.

त्यानंतर कृषी साह्याकाने खड्डे पडण्यास सांगितले ते पडण्यातही आले. मात्र हे खड्डे चुकीचे असल्याचे सांगून पुन्हा नव्याने खड्डे पाडायला लावले एकीकडे दोन वेळा खड्डे आणि मंजुरी साठी खर्च, श्रम आणि वेळ वाया घालवावा लागला. त्यामुळे खड्डे केले त्याचे बिल मिळावे म्हणून कांही दिवसापासून भागवत सगर कृषी विभागात हेलपाटे घालत होते. परंतु त्यांना येथील अधिकारी व कर्मचारी नुसते झुलवत होते.

Farmer Sucide
Chef Sanjeev Kapoor : मास्टर शेफला खावं लागलं शिळ अन्न; एअर इंडीयावर भडकले संजीव कपूर

लोकांकडून हातउसने पैसे घेऊन फळबाग लागवड केलेल्या या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अवस्थेचा मार खावा लागत होता. आपल्याला कोणीच वाली नाही आणि कृषी विभागातील लोकं आपल्याला दाद देत नसल्याने भागवत सगर यांनी सोमवारी कृषी कार्यालयातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका टॉपर कृषी पदवी धारकाला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर या कृषी विभागात चालले आहे तरी काय? याची माहिती वरिष्ठांकडून घेणे गरजेचे आहे.

दरम्यान भागवत सगर यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी येथील तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांना फोनवर संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.