नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. (Young woman dies due to wrong injection Nanded )
नेमकं काय घडलं?
देडच्या शासकीय रुग्णालयात उपचरादरम्यान एका तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू चूकीचे इंजेक्शन दिल्यानेच झाल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.(Latest Marathi News)
प्रजापती लांडगे अस या तरुणीचे नाव आहे. ती नर्सिंग कॉलेज मध्ये प्रथम वर्षात शिकत होती. १८ मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली.
त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, १९ मे रोजी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(Latest Marathi News)
दरम्यान, सबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तरुणीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. मागील ४ दिवसांपासून तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात आहे. (Latest Marathi News)
आज तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रजापती लांडगे हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दखल करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.