Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्या आहेत. शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
- केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार
- कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
- शिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार