झेडपी, महापालिका शाळांमध्ये पुन्हा अंशकालीन निदेशक! 1,751 शाळांमधील सहावी व आठवीच्या वर्गांची पटसंख्या शंभरावर; 5,253 निदेशकांचा मार्ग मोकळा

महापालिका व जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांमधील सहावी, आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या १०० हून अधिक आहे, अशा एक हजार ७५१ शाळा आहेत. त्याठिकाणी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी प्रत्येकी एक अंशकालीन निदेशक अपेक्षित आहेत.
zp school
zp schoolmaharashtra
Updated on

सोलापूर : महापालिका व जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांमधील सहावी, आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या १०० हून अधिक आहे, अशा एक हजार ७५१ शाळा आहेत. त्याठिकाणी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी प्रत्येकी एक अंशकालीन निदेशक अपेक्षित आहेत.

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या निदेशकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत, त्या कार्यरत अंशकालीन निदेशकांची शाळानिहाय माहिती सादर करावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षणाधिकारी व महापालिकांच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले आहेत. तत्पूर्वी, २ जुलै २०२४ रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आदेश देत जे अंशकालीन निदेशक न्यायालयात गेले नाहीत, त्यांनाही हजर करून घेण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. शासनाच्या आदेशानुसार एक हजार ९०५ अंशकालीन निदेशक न्यायालयात गेले होते. सुरवातीला त्याच निदेशकांना हजर करून घेण्याचे आदेश निघाले होते. पण आता शिक्षणमंत्र्यांनी न्यायालयात न गेलेल्या त्या अंशकालीन निदेशकांनाही हजर करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

‘या’ मुद्द्यांची मागविली माहिती

  • जिल्हा परिषद, महापालिकेचे नाव

  • तालुका व शाळेचे नाव

  • सेवा समाप्त अंशकालीन निदेशकाचे नाव

  • नियुक्ती दिनांक व अभिप्राय

पाच हजार २५३ शाळांवर असतील अंशकालीन निदेशक

जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या ज्या शाळांमधील सहावी व आठवीच्या वर्गाची पटसंख्या १०० किंवा त्याहून जास्त आहे, अशा शाळांची संख्या एक हजार ७५१ आहे. त्याठिकाणी कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच हजार २५३ अंशकालीन निदेशक नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार आता कार्यवाही होईल. दरम्यान, १३ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत, त्या कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांची शाळानिहाय माहिती आता शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकाऱ्यांकडून शासनाला (महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद) सादर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.