Maharashtra ZP Bharti : आरोग्य परिचारिका शैक्षणिक पात्रतेबाबत संभ्रम; उमेदवारांना अर्ज दाखल करताना अडचणी

Recruitment
Recruitment esakal
Updated on

Maharashtra ZP Bharti : तलाठी भरतीचा गोंधळ सुरू असतानाच जिल्हा परिषदांमधील पदभरतीबाबत अर्ज भरताना विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.

पदभरतीत आरोग्य परिचारिका म्हणजे (आरोग्यसेवक महिला) या पदासाठी लागणाऱ्या पदासाठी किमान किंवा कमाल शैक्षणिक अर्हता नेमकी काय आहे, याविषयी ठळक उल्लेख नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम असून, अर्ज दाखल करताना उमेदवारांना अडचणी येत आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने शासनाने याबाबत खुलासा करण्याची मागणी उमेदवारांकडून होऊ लागली. (zp recruitment Confusion about health nurse educational qualification maharashtra news)

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांसाठी पद भरती होत असून, त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यात आरोग्य परिचारिका म्हणजे (आरोग्यसेवक महिला) या पदासाठी लागणाऱ्या उचित शैक्षणिक अर्हता म्हणजेच किमान किंवा कमाल शैक्षणिक अर्हता काय असेल, याच्याविषयी उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे.

आरोग्य परिचारिका या पदासाठी एएनएम (Auxilary Nurse Midwife) पात्र आहेत. परंतु, या पदासाठी उच्चशिक्षण असणारे जीएनएम (general nursing midwifery) व बी.एस्सी. नर्सिंगचे (BSC NURSING) विद्यार्थी पात्र आहेत की नाही, याच्याविषयी जाहिरातीत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.

तसेच, अर्ज भरतानाही आणि बी.एस्सी. पदवी सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही आरोग्य परिचारिका या पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज भरावा की नाही, अर्ज भरताना तिथे काय सिलेक्ट करावे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना अडचण येती आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Recruitment
Maharashtra PWD Bharti : बांधकाम विभागाची भरती लांबणीवर; 1903 जागा रिक्त

"जिल्हा परिषद प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला असता प्रशासनाने अर्ज मागवत असलेल्या आयबीपीएस कंपनीशी संपर्क साधवा, असे सांगितले. आयबीपीएस कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून जिल्हा परिषदांशी बोलावे, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शासनाने यावर योग्य ते मार्गदर्शन तसेच शुद्धिपत्रक काढून माहिती द्यावी. तसेच, अर्ज भरण्याचा कालावधी वाढवून द्यावा." - मोनाली ढवळे, उमेदवार, अकोला

"जिल्हा परिषद भरतीत आरोग्यसेविका किंवा आरोग्य परिचारिका या पदासाठी शैक्षणिक अर्हताचा उल्लेख नसल्याने बऱ्याच उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होत आहे. उच्चशिक्षण घेऊनही त्यांना कनिष्ठ पदासाठी अर्ज करता येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संभ्रमामुळे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांवर अन्याय होत असून, त्यांना अर्ज करता येत नाही." - सागर चव्हाण, सक्सेस करिअर अॅकॅडमी

Recruitment
MPSC Bharti : एमपीएससीच्‍या विविध पदांसाठी अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; विविध विभागातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()