माजी खासदार धर्मण्णा सादूल नाराज! ‘बीआरएस’ला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतणार?

सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या ‘BRS’मध्ये प्रवेश केलेले धर्मण्णा सादूल आता राजीनामा देऊन पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोलले जात आहे.लवकरच निर्णय जाहीर करू असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
dharmnna sadul
dharmnna sadulsakal
Updated on

सोलापूर : सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केलेले धर्मण्णा सादूल आता राजीनामा देऊन पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोलले जात आहे. आपण लवकरच निर्णय जाहीर करू असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

आगामी महापालिका निवडणूक व लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सादूल यांनी सोलापूर शहरात ‘बीआरएस’ला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा थेट संपर्क तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी होता. तसेच ते तेलंगणच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांशी देखील संपर्कात होते.

आषाढी वारी काळात भगिरथ भालके यांच्या पक्ष प्रवेशासाठी पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री केसीआर यांनी सादूल यांच्या घरी देखील भेट दिली होती. पण, भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह अन्य माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दशरथ गोप यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केल्यानंतर श्री. सादूल यांना ‘बीआरएस’कडून डावलेले जात आहे. पक्षासाठी अहोरात्र मेहनत केली आणि सोलापूर शहरात पक्षाचे झेंडे पाहायला मिळाले. तरीपण, पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याबद्दल त्यांनी स्वत: ‘सकाळ’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. माझ्यासोबत आलेले अनेक कार्यकर्ते देखील नाराज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सहा महिने होऊनही काहीच जबाबदारी नाही

नांदेडमध्ये सभा घेऊन ‘बीआरएस’ने महाराष्ट्रात पाऊल ठेवले. त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना तेलगू भाषिकांचा आश्वासक चेहरा म्हणून पक्षात येण्याची गळ घातली. त्यानंतर श्री. सादूल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला. अनेक मुस्लिम, मराठा व मागासवर्गीय लोकांसह तेलगू भाषिक त्यांच्यासोबत जोडले गेले. पण, सोलापूर शहरातील अनेकांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आणि सादूल यांना डावलले जाऊ लागले. दुसरीकडे सहा महिने होऊनही त्यांना पक्षाने कोणतीच जबाबदारी दिली नाही. या पार्श्वभूमीवर आता त्यांची खदखद समोर आली असून आगामी काही दिवसांत ते पुन्हा स्वगृही परततील, अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.