Natya Sammelan: कोरोनामुळं रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं अखेर बिगुल वाजलं! 5 जानेवारीपासून नांदीला सुरुवात

डॉ. जब्बार पटेल हे या १००व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.
Natya Sammelan
Natya Sammelan
Updated on

मुंबई : सन २०२० मध्ये पार पडणार १०० अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं बिगुल अखेर वाजलं आहे. येत्या ५ जानेवारापीसून पुण्यातून या नाट्यसंमेलनाला सुरुवात होणार आहे. ५ जानेवारी २०२४ ते मे २०२४ अशी पाच महिने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे संमेलन चालणार आहे. हे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

तर स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्य निमंत्रक उदय सामंत असणार आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि निमंत्रक उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan starts from 5th January at Pune Dr Jabbar Patel will be President)

Natya Sammelan
Revanth Reddy: मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यानंतर रेवंथ रेड्डींनी केलं ट्विट; म्हणाले, आमच्या सैनिकांनी...

तंजावर येथील ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली इथं २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्यानंतर शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे इथं सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी इथं होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहेत.

Natya Sammelan
Senthil Kumar: "भाजप फक्त 'गौ मुत्र' राज्यांमध्येच जिंकतो"; DMK खासदाराच्या विधानामुळं नवा वाद

असा असेल कार्यक्रम?

५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार

६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार

७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

२० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर

२७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर

४ फेब्रुवारी २०२४ बीड

१० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर

१७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर आणि मुंबई

या ठिकाणी नाट्य संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Natya Sammelan
Video: गोगामेडींच्या हत्येचा व्हिडिओ आला समोर; बिश्नोईच्या गँगच्या रोहित स्वामीनं घेतली जबाबदारी

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला आहे. यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

Natya Sammelan
Cash for Kidney Scam: 'अपोलो'नं श्रीमंतांसाठी गरिबांना आमिष दाखवून किडनी खरेदी केल्या?; रुग्णालयाच्या ग्रुपचं स्पष्टीकरण

अशी असतील विजेत्या नाटकांसाठीची बक्षीसं

एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे.

अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख

दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय व तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रू. १०,०००/-, रू. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत.

या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.

अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.

सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()