12TH Fail Movie Trailer Vikrant Massey Lead Role : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांपुढे वेगळी ओळख तयार करणाऱ्या सध्याच्या अभिनेत्यांमध्ये विक्रांत मेस्सीचे नाव घ्यावे लागेल. त्यानं हसीन दिलरुबामध्ये साकारलेली भूमिका, मिर्झापूर या मालिकेत गुड्डू भैय्याचा लहान भावाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अशात त्याच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
विक्रांत मेस्सीचा १२ फेल नावाचा चित्रपट ऑक्टोबरच्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काहीही झालं तरी युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी व्हायचचं असं स्वप्न त्याच्या मनात आहे. त्यासाठी तो जीवघेण्या संघर्षाला सामोरा जातो. त्याला वाटेत जी संकटं येतात त्यावर तो कशी मात करतो हे सांगणारा चित्रपट म्हणून १२ वी फेलकडे पाहता येईल.
Also Read Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?
प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक, विक्रांतचे चाहते वाट पाहत आहेत. खरं तर यापूर्वी ओटीटीवर युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या अनेक सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास द अॅस्पिरंट या मालिकेचे नाव घ्यावे लागेल. युवावर्गाची त्याला मोठी पसंती मिळाली होती.
12TH Fail मध्ये विक्रांतनं युपीएससी अॅस्पिरंट विद्यार्थ्यांची भूमिका साकारली आहे. तो मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या अभिनयाला आणि त्यानं म्हटलेल्या संवादावर आता चाहते बेहद्द खूश आहेत. चंबळ सारख्या एका खेडेगावात राहणारा तो, त्याला युपीएससीमधून मोठा अधिकारी होण्याची स्वप्नं पडू लागतात. त्याला त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी किती मोठया संघर्षाला सामोरं जावं लागतं, हे त्या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न विधू विनोद यांनी केला आहे.
विक्रांतनं स्वताला या चित्रपटासाठी उत्तमरित्या साकारले आहे. त्याचा फिजिकल फिटनेस हा कमालीचा आहे. त्याचे दिसणे चाहत्यांना कमालीचे भावले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12TH Fail हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्यातून हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न निर्मात्यांचा आहे.
युपीएससीची प्रवेश परीक्षा देण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. त्यातून काही हजार विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळते. त्यातून शेकडो विद्यार्थी मुलाखतीपर्यत जातात. असा हा प्रवास दिग्दर्शकानं 12TH Fail मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. विधू विनोद चोप्रा यांचा हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.