RRR: फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नाव

मानाच्या जागतिक गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नाव कोरल्यावर RRR ने आत्ता आणखी एक बहुमान मिळवला आहे.
RRR: फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नाव
RRR: फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नावSAKAL
Updated on

मानाच्या जागतिक गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नाव कोरल्यावर RRR ने आत्ता आणखी एक बहुमान मिळवला आहे. 28 व्या जागतिक Critics चॉईस अवॉर्ड मध्ये बेस्ट फॉरेन सिनेमा म्हणून RRR ला पुरस्कार मिळाला आहे. RRR चे दिग्दर्शक राजामौली यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

RRR: फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नाव
RRR Oscar Entry : आतापर्यंत हिंदीच चित्रपटच ऑस्करला कसे गेले? RRR चा एनटीआर भडकला!

याशिवाय याच पुरस्कार सोहळ्यात RRR सिनेमाने बेस्ट साँग असाही पुरस्कार पटकावला आहे. एकूणच RRR सिनेमाची जागतिक पातळीवर प्रचंड दखल घेतली जात आहे. 'नाटू नाटू पुन्हा' असं ट्विट करत RRR च्या टीमने पुन्हा एकदा आनंद साजरा केलाय.

गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर आरआऱआऱला ऑस्कर मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर ज्युनिअर NTR म्हणाला की, "भारतामध्ये होणारं राजकारण हे काही नवं नाही. आमच्या सिनेमाचे सिलेक्शन का झाले नाही असा प्रश्नही आम्हालाही पडला होता. गुजराती सिनेमा' छेलो शो' ला हा मान मिळाला. हरकत नाही. पण कदाचित भाषा महत्वाचा मुद्दा ठरला असेल."

याआधी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर RRR सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय मनोरंजन विश्वाची मान उंचावली आहे. RRR सिनेमाच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर अशी, ती म्हणजे RRRचा आता सिक्वल येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड्स २०२३ मध्ये बोलताना यावर शिक्कामोर्तब केलं.

RRR: फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नाव
RRR: 'गरज सरो..वैद्य मरो..',गोल्डन ग्लोब जिंकल्यावर राजामौलींंनीही बॉलीवूडला दाखवली लायकी..म्हणाले..

एकूणच आधी गोल्डन ग्लोब आणि आता मानाच्या 28 व्या जागतिक Critics चॉईस अवॉर्ड मध्ये RRR ने पुरस्कार पटकावल्याने जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाची दखल घेतली जात आहे. RRR ला अजून कोणते बहुमान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()