Priyanka Chopra News: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे आता भारतात आले आहे. ते भारतात येण्यामागील कारण म्हणजे प्रियंकाची बहिण परिणीती चोप्रा हे आहे.
परिणीती आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाबाबत मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत आल्याची चर्चा सुरु झालीय.
आता प्रियंका मुंबईत आल्यावर तिने नवरा निक जोनास सोबत खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे.
(65 years ago dress and Priyanka chopra mumbai rickshaw journey with Nick jonas in Mumbai)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास मुंबईत भटकंतीचा आनंद घेत आहेत. प्रियांकाने तिचा नवरा निक जोनाससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या नाईटचे फोटो शेअर करताना, प्रियंका लिहिले, “माझ्या हक्काच्या माणसासोबत निक सोबत डेट नाईट.." या फोटोत प्रियंका मुंबईच्या रिक्षात दिसत असून तिने निक सोबत खास पोझ दिलीय. रिक्षावाला सुद्धा या दोघांकडे आश्चर्याने पाहतोय.
प्रियंकाने जो ड्रेस परिधान केलाय त्याबद्दल तिने खास गोष्ट सांगितली, प्रियंका लिहिते.. “हा सुंदर पोशाख 65 वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीचा वापर करून बनवला गेलाय.
यात चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग वापरूले आहे." अशाप्रकारे ६५ वर्षांपूर्वीची साडी रिसायकल करून प्रियंकाने हा खास ड्रेस परिधान केलाय.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास त्यांची मुलगी मालती सोबत भारतात आले आहेत. प्रियांका-निक मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर NMACC च्या भव्य उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात प्रियंका अनेक महिन्यांनी बॉलिवूड कलाकारांसोबत दिसली.
प्रियंका आणि निक मालतीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तिला घेऊन भारतामध्ये येत आहे. ते भारतात आल्यानंतर फोटोग्राफर्सनं त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे.
पापाराझ्झींनी मालती, प्रियंका आणि निक यांचे फोटो घेऊन ते सोशल मीडियावर शेयर केले आहेत. आता प्रियंकाची बहीण परिणीती राघवसोबत लग्न करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.