69th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारावर 'रॉकेट्री' झालं लँड! 'एकदा काय झालं'नं देखील मारली बाजी

६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली.
69th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारावर 'रॉकेट्री' झालं लँड! 'एकदा काय झालं'नं देखील मारली बाजी
Updated on

69th National Film Awards : ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये 'रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. (69th National Film Awards Rocketry The Nambi Effect wins Best Feature Film Award)

अलिया, क्रिती ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

त्याचबरोबर 'गोदावरी' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'चंद सासें' या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक सिनेमा हा पुरस्कार घोषित झाला आहे.

'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमासाठी अलिया भट आणि 'मिमी' या सिनेमासाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

69th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारावर 'रॉकेट्री' झालं लँड! 'एकदा काय झालं'नं देखील मारली बाजी
National Film Awards 2023: 'द काश्मिर फाईल्स'ने राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव, मराठी सिनेमांचीही सरशी

कोणाला मिळाला कुठला पुरस्कार? पाहा यादी

  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'

  2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी)

  3. सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जून (पुष्पा)

  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)

  5. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

  6. सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल

  7. सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - गंगूबाई काठियावाडी

  8. सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - सरदार उधम

  9. सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - एकदा काय झालं

  10. सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी - आरआरआर

  11. सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर

  12. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा

  13. सर्वोत्कृष्ट एडिटर - गंगूबाई काठियावाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.