72 Hoorain Review: दहशतवाद्याच्या डोळ्याची झापडं उघडणारा... कसा आहे 72 हुरे, वाचा एका क्लिकवर

कसा आहे 72 हुरे सिनेमा.. सिनेमाचा विषय काय? जाणुन घेऊ
72 hoorain bollywood movie review directed by Sanjay Puran Singh Chauhan
72 hoorain bollywood movie review directed by Sanjay Puran Singh ChauhanSAKAL
Updated on

72 Hoorain Film Review: गेल्या काही दिवसांपासुन 72 हुरे सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. 72 हुरे सिनेमा आज देशभरात रिलीज झालाय.

72 हुरे सिनेमाचा विषय, काहीसा वादग्रस्त असल्याने सिनेमाविरोधात सुरुवातीपासुन नाराजीचे सूर उमटत आहेत. कसा आहे 72 हुरे सिनेमा.. सिनेमाचा विषय काय? जाणुन घेऊ

(72 hoorain bollywood movie review directed by Sanjay Puran Singh Chauhan)

72 hoorain bollywood movie review directed by Sanjay Puran Singh Chauhan
Mahesh Manjrekar: माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर.. महेश मांजरेकरांच्या विधानाची एकच चर्चा

काय आहे 72 हुरे ची कथा?

हकीम (पवन मल्होत्रा) आणि साकिब (आमिर बशीर) यांची ही कथा आहे. चित्रपटाची सुरुवातीला असं दिसतं की हकीम त्याच्या हाताला अमेरिकेचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खेळणं म्हणुन वापरत असते.

एका मौलानाच्या शब्दात सांगायचे तर, हे दोन मध्यमवयीन माणसे जन्नत आणि 72 हुरेंच्या लालसेने पाकिस्तानातून भारतात येतात.

एकीकडे धर्म आणि जिहादच्या गप्पा मारणाऱ्या या दोघांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट नाही हे दिसचं. हे दोन आत्मघाती हल्लेखोर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर अल्लाहच्या नावाने बॉम्बस्फोट करतात.

72 hoorain bollywood movie review directed by Sanjay Puran Singh Chauhan
OMG 2 Yami Gautam: आता थेट देवाला खेचणार कोर्टात, ओह माय गॉड 2 मधील यामीचा फर्स्ट लुक व्हायरल

हकीम आणि साकिबचा 72 हुरें मिळवण्याचा प्रवास मृत्यूनंतर सुरू होतो. त्यांचे आत्मे जन्नतपर्यंत पोहोचतात का, त्यांना 72 हुरे मिळतात का, मौलवींच्या प्रवचनानुसार या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अल्लाहचे दूत येतात का,

हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये 72 हुरे पाहावी लागतील. एकुणच धर्माच्या नावाने तरुणांची माथी कशी भडकवली जातात, याचं चित्रण पहायला मिळतं.

अभिनय कसा आहे?

72 हुरें चित्रपटात पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर दहशतवाद्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली.

कदाचित त्यामुळेच हे दोघेही आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण 101 मिनिटे प्रेक्षकांना खिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

धर्माच्या अभिमानापासून ते हृदय पिळवटून टाकणाऱ्या सत्याला सामोरे जाण्यापर्यंत या दोन पात्रांच्या देहबोलीत आणि अभिव्यक्तीमध्ये हळूहळू होणारा बदल या दोघांनी अभिनयाद्वाते अगदी अचूक दाखवला आहे.

एकुणच सिनेमाचा विषय चांगला आहे पण मांडणीत फसला आहे. मांडणी अजुन प्रभावी झाली असती. जर तुम्हाला मनोरंजन हवं असेल तर 72 हुरें तुमची निराशा करेल. पण जर काहीतरी वेगळं बघायचं असेल तर मात्र 72 हुरें एकदा पाहण्यास हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.