72 Hoorain: 'हा तर आमच्या धर्माचा अपमान', निर्माता-दिग्दर्शकाविरोधात तक्रार

72 Hoorain Makers In Legal Trouble
72 Hoorain Makers In Legal TroubleSAKAL
Updated on

72 Hoorain Makers In Legal Trouble: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात चित्रपटावरुन वाद निर्माण होत आहेत. चित्रपट प्रदर्शनापुर्वीच त्याबाबत वाद तयार होतो. अशाच वादात 72 हुरें हा चित्रपट अडकला आहे.

या चित्रपटाच्या टिझरवरुनही बराच वाद रंगला होता. त्यातच सेसॉर बोर्डाने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यास मनाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या निर्णयाचा विरोध केला. त्यानंतर 72 हुरें या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटलरित्या रिलिज करण्यात आला.

त्यातच आता पुन्हा हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. सय्यद अरिफअली मेहमूदअली नावाच्या व्यक्तीने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात ‘72 हूरें’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात त्यांच्या धर्माचा अपमान आणि भेदभाव, द्वेषाला प्रोत्साहन आणि मुस्लिम समाजाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पुन्हा या चित्रपटाच्या बंदीची मागणी सुरु झाली आहे.

72 हूरें हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी केलं आहे. हा चित्रपट दहशतवादाच्या घटनेभोवती फिरतो. 7 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नुकतेच जेएनयूमध्ये स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. या चित्रपटाचे पोस्टरही जेएनयूबाहेर लावण्यात आले आहेत.

72 Hoorain Makers In Legal Trouble
Prajakta Gaikwad : 'प्राजक्ता राजकारणात जाऊ नकोस'! अभिनेत्रीला कुणाचा सल्ला?

72 हूरें च्या कथेबद्दल सांगायचं झालं तर रिलिज झालेल्या ट्रेलरनुसार या चित्रपटाची कथा दहशतवादाच्या आवतीभोवती फिरते.

तरुणांची दिशाभूल करून त्यांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते. त्याचा त्यांच्यावर कसा फरक पडतो आणि नंतर परिस्थीती काय होते. हे सगळं या चित्रपटात दिसेल. अनेक गंभीर विषयांवर हा चित्रपट आघात करतो.

72 Hoorain Makers In Legal Trouble
Chandu Champion : कार्तिकही ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणार, 'चंदू चॅम्पियन'ची घोषणा

मात्र या चित्रपटात केवळ एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. देशात द्वेष वाढू शकतो असं म्हणत अनेकांनी याचित्रपटामुळे द्वेष वाढेल असे बोलले जात आहे.

दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संजय पूरण सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर किरण डागर, गुलाब सिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.