72 Hoorain Trailer: '72 हूरें'ला सेन्सॉर बोर्डाचा दणका! निर्माता भडकला.. काय आहे संपूर्ण प्रकरण

CBFC Refused To Give Certificate To 72 Hoorain Trailer Ashoke Pandit Reacted On Board Decision
CBFC Refused To Give Certificate To 72 Hoorain Trailer Ashoke Pandit Reacted On Board DecisionEsakal
Updated on

72 Hoorain Trailer: सध्या मनोरंजन विश्वातील चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी आणि वाद जास्त होतांना दिसत आहे.

आधी पठाण नंतर द केरळ स्टोरी आणि त्यानंतर आदिपुरुष आता हा वाद संपत नाही तोच आणखी एक नवा चित्रपटाचा टिझर वादात अडकला.

त्या चित्रपटाचे नाव आहे '72 Hoorain '. चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलिज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता.

धर्मांतरण, दहशतवादी कटस्थान आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉशिंग करुन त्याच्या कडून कशाप्रकारे दहशवादी काम करुन घेतले जाते अशा पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या '७२ हुरैन' या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डाने दणका दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

CBFC Refused To Give Certificate To 72 Hoorain Trailer Ashoke Pandit Reacted On Board Decision
The Kerala Story : केरळ स्टोरीला OTT प्लॅटफॉर्म का मिळेना? खरं कारण आलं समोर...

CBFC च्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य या मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे. आता चित्रपटाचे निर्माते सीबीएफसीच्या निर्णयाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

CBFC Refused To Give Certificate To 72 Hoorain Trailer Ashoke Pandit Reacted On Board Decision
Bollywood Copy Song : चोरटं बॉलीवूड, ती गाजलेली '१०' गाणी पाकिस्तानची चोरलेली!

त्याचवेळी आता या चित्रपटाचा ट्रेलर नाकारल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. आता या निर्णयाविरुद्ध आता चित्रपटाचे निर्मात्याचे हा मुद्दा वरिष्ठांकडे नेणार आहेत.

निर्माते म्हणाले की, आम्ही ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवू आणि संबंधित अधिकार्‍यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करू आणि CBFC च्या उच्च अधिकार्‍यांकडून देखील या निर्णयावर स्पष्टीकरण मागणार आहोत.

सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयानंतर आता चित्रपटाचे निर्मात्यांना 72 हूरेंचा ट्रेलर थिएटरमध्ये दाखवता येणार नाही आहे. आता निर्माते 28 जून रोजी तो डिजिटल पद्धतीने ट्रेलर रिलीज करतील असं बोललं जात आहे.

CBFC Refused To Give Certificate To 72 Hoorain Trailer Ashoke Pandit Reacted On Board Decision
Arijit Singh On Pasoori Nu: 'म्हणून मी पसुरी गाणं गायलं', ट्रोलिंगनंतर अरिजितनं सांगितलं खरं कारण..

दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संजय पूरण सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर किरण डागर, गुलाब सिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

ओसामा बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांची नावं चित्रपटाच्या टिझरमध्ये समाविष्ट केली आहेत.

त्याची झलकही या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसते. आता त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करणाऱ्याला सेन्सॉर बोर्डाने मनाई केल्यामुळे आता निर्माते पुढे काय करतील आणि चित्रपटाच्या प्रदर्शनावर याचा काय परिणाम होईल हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.