72 Hoorain Twitter Review: गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात 72 हुरें ची चर्चा सुरु होती. चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यापासूनच या चित्रपटाबातत वाद सुरु होता.
त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या ट्रेलर रिलिजवर अनेक प्रश्न उपस्थित करत या ट्रेलर रिलिजला मनाई केली.
त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली . मात्र सर्व अडचणींवर मात करत आज 72 हुरें चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात दहशतवादाचे काळे सत्य समाजपुढे उघड करण्यात आले आहे. यासोबतच काही मौलाना सर्वसामान्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना काही दिवसांत त्यांना आत्महत्या करायला लावतात. त्यांना कसे मुर्ख बनवण्यात येते हे सांगण्यात आलं आहे. हे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आले होते.
त्यांना मृत्यूनंतर त्यांना 72 हुरें मिळणार असं आमिष दाखवण्यात येतं. ज्या जन्नतमध्ये त्यांचे स्वागत करतील.
विशेष म्हणजे कोणत्याही धर्माला टार्गेट न करण्याचा सर्वतोपरी चांगल काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याच्या चर्चा होत आहे. समिंश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
एकानं लिहिलयं की, 'अविश्वसनीय कामगिरी, आकर्षक कथानक आणि एक शक्तिशाली संदेश - #72हुरेनकडे हे सर्व आहे! नक्कीच पहा!!!'
दरम्यान या चित्रपटाबाबत आता ट्विटरवर प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. आल्या आहेत. हा चित्रपट लोकांना कसा आवडला हे त्यांनी सांगतिलं आहे.
पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांचा दमदार अभिनय '72 हुरें'मध्ये पाहायला मिळत आहे. ट्विटरवर लोकांनी हा चित्रपट नक्की बघावा असं आवाहन केलं आहे. चित्रपट पाहणारे लोक निर्मात्याचे कौतुक करत आहेत.
तर दुसऱ्याने लिहिलं की, 'पहिली 15 मिनिटे छान आहेत. अतिशय आकर्षक कथा, उत्तम परफॉर्मन्स, ब्लॅक अँड व्हाईट थीम अतिशय जबरदस्त..ब्रेनवॉश केलेले व्हिज्युअल छान आहेत, मौलानाचा अभिनय खूप चांगला आहे.
तर एकानं लिहिलयं की, मुस्लिम बांधवांनी एकदा नक्कीच पाहावा कारण ते त्यासाठी मरत आहे.
एकानं लिहिलयं की, खुपच मनोरंजन कथा एका संदेशासोबत..कमाल..
72 हुरें हा एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे, चित्रपटाचे बजेट फक्त 10 कोटी आहे, मात्र चित्रपटात भरपूर VFX दाखवण्यात आले आहेत. ज्याने चित्रपटाला खुपच मनोरंजक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.