Rajinikanth Temple: थलायवाचं आमचा 'गॉड'! चाहत्यानं बनवलं रजनीकांतचं मंदिर, भव्यदिव्य मुर्तीची चर्चा, व्हिडीओ बघा

रजनीकांतच्या फॅनने उभारलेल्या भव्यदिव्य मंदिराची सगळीकडे चर्चा आहे
A fan is worshiping actor Rajinikanth by building a temple in tamilnadu madurai
A fan is worshiping actor Rajinikanth by building a temple in tamilnadu madurai SAKAL
Updated on

Rajinikanth Temple News: सुपरस्टार रजनीकांत हा बॉलिवुडच नव्हे तर संपुर्ण भारतीय सिनेविश्वाचा सुपरस्टार म्हणुन ओळखला जातो. रजनीकांतने वयाची साठी ओलांडली असली तरीही आजही अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांंचं मनोरंजन केलंय.

रजनीकांतचे फॅन त्याच्यावर मनापासुन प्रेम करत असतात. रजनीकांतच्या अशाच एका चाहत्याने रजनीकांतचं मंदिर उभारलंय. या मंदिरातल्या मुर्तीची सगळीकडे चर्चा आहे.

(A fan is worshiping actor Rajinikanth by building a temple in tamilnadu madurai)

A fan is worshiping actor Rajinikanth by building a temple in tamilnadu madurai
Who Killed Moosewala: सिद्धू मूसेवालाला कोणी मारलं? 'हा' लोकप्रिय दिग्दर्शक बनवणार सिनेमा

फॅनने उभारलं रजनीकांतचं भव्यदिव्य मंदिर

मेगास्टार रजनीकांतच्या डाय-हार्ड फॅनने तामिळनाडूमधील मदुराई येथे त्याच्या घराच्या आवारात थलैवाला समर्पित मंदिर बांधले आहे.

रजनी फॅन कार्तिकने त्याच्या घराच्या जागेचा एक भाग मंदिरात रूपांतरित केला जिथे त्याने रजनीकांतचा पुतळा स्थापित केला आहे. कार्तिकच्या म्हणण्यानुसार रजनीकांतच्या मूर्तीचे वजन 250 किलो आहे.

रजनीकांत आम्हाला देवासारखा: फॅन कार्तिक

कार्तिकने ANI ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "आमच्यासाठी रजनीकांत हे देव आहेत. मी त्यांच्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी हे मंदिर बांधले आहे,"

फॅन कार्तिकची मुलगी अनुशिया रजनीकांतचे कौतुक करत म्हणाली, "आम्ही जसं मंदिरात देवाची पुजा करतो त्याचप्रमाणे रजनीकांतच्या मूर्तीची पूजा करतो" ती म्हणाली. सध्या या अनोख्या मंदिराची चांगलीच चर्चा आहे.

रजनीकांतचं वर्कफ्रंट

दरम्यान, रजनीकांतने जेलर सिनेमाच्य निमित्ताने यशाची गोडी चाखली. रजनीकांतच्या जेलर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी करत कोट्यावधी रुपये कमावले.

रजनीकांत सध्या Thalaiver 170 सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल ३६ वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.