शाहरुख खानच्या जवान रिलीजला अवघा १ दिवस शिल्लक आहे. जवान सिनेमाची केवळ भारतात नाही तर जगभरात क्रेझ आहे.
शाहरुख खान, विजय सेथुपती, नयनतारा अशा कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भुमिका आहेत. जवान सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींग सध्या जोरात सुरु आहे. पण रिलीजपुर्वीच जवानला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. काय आहे कारण? जाणुन घ्या.
(A Few Theatres In Delhi Remain Shut For G20 Summit Shah Rukh Khan’s Jawan Affect)
शाहरुखच्या जवानला मोठं नुकसान
जवान चित्रपटाच्या रिलीजआधीपासुन सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. पण सिनेमाला रिलीजपुर्वीच मोठा फटका बसलाय.G20 शिखर परिषदेमुळे, देशाची राजधानी दिल्लीमध्ये 3 दिवसांसाठी म्हणजेच 8-10 सप्टेंबरपर्यंत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या दरम्यान सरकारी आणि खाजगी कार्यालये बंद राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून खाजगी सेवा बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत काही चित्रपटगृहेही बंद राहणार असून त्याचा 'जवान'च्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
दिल्लीतील ही सिनेमागृहे बंद राहतील
PVR-INOX Ltd चे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली यांनी PTI ला सांगितले की, "G20 शिखर परिषदेमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मध्य दिल्लीतील PVR प्लाझा, रिवोली, ओडियन आणि ECX चाणक्यपुरी ही चार PVR थिएटर बंद राहतील. याचा चित्रपटावर फारसा परिणाम होणार नाही कारण सर्व सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरु असणार आहेत. ज्यात एकावेळी सुमारे 2,000 प्रेक्षक सिनेमाचा आनंद घेऊ शकतील"
मध्यरात्री २ वाजता जवान पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
नुकताच जस्ट अ फॅन नावाच्या शाहरुख खानच्या फॅन ग्रुपने अलीकडेच X वर एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये SRK फॉलोअर्स पहाटे 2 वाजता लांब रांगेत उभे असुन बुकिंग काउंटर उघडण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. फॅन पेजनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगावमधील सिनेमागृहातला आहे.
शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. 'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.