mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat movie update : दहा दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बहूचर्चित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोल्हापुरातील पन्हाळ गडावरुन एक तरु दरीत कोसळला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या या तरूणावर गेली दहा दिवस एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यानच त्याला मंगळवारी २८ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
(a young man died who fell from panhala fort during mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat shooting in kolhapur)
पन्हाळा गडावरील सज्जा कोठी परिसरात महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील एक तरुण तटबंदीवरून दारीत कोसळला होता. साधारण १८ मार्च रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर त्या तरुणाला तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नागेश खोबरे असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या १९ वर्षांचा होता. मूळचा सोलापूरचा असलेला नागेश चित्रपटाच्या सेटवर घोड्यांची देखभाल करण्याचे काम करत होता. मोबाईलवर बोलत असताना दरीचा अंदाज आला नसल्याने तो कोसळला आणि त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला.
नागेशच्या मृत्यूनंतर खर्चावरून वाद..
उपचारासाठी दाखल केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलेल्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देण्याचे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र, गेल्या दहा दिवसात चित्रपटाच्या व्यवस्थापकांनी कोणताही खर्च दिला नाही असा आरोप आरोप नागेशच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने मंगळवारी दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून होता. अशी माहिती नागेशच्या नातेवाईकांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.