Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेत नातीच्या आगमनानं घरात आनंदीआनंद दिसत असला तरी अरुंधती लग्न करणार असल्यामुळे एरव्हीही तिखटच वागणारा अनिरुद्ध सध्या जरा जास्तच उद्धट वागताना दिसतोय.
कधीतरी तो इतका काहीबाही अर्थहीन बोलून जातो की प्रेक्षकांना एक सणसणीत याच्या कानाखाली द्यावी असा विचार मनात आला तर नवल नव्हे. आता प्रेक्षकांना एखाद्या भूमिकेचा राग येणं इतपत ठीक आहे..
पण स्वतः ती भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला भूमिका नकोशी वाटणं आणि त्यानंच त्या विरोधात भडाभडा बोलणं हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं.
अनिरुद्ध साकारणाऱ्या मिलिंद गवळीनं सध्या एक पोस्ट केलीय जिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Aai Kuthe Kaay Karte marathi serial milind gawali post dislike his own character aniruddha's attitude)
मिलिंद गवळीनं 'आई कुठे काय करते' या मालिकेतील आपल्या भूमिके विरोधात एक संतप्त पोस्ट केली आहे.
त्यानं लिहिलं आहे,“अनिरुद्ध अरे थांब जरा थांब , किती बोलतोयस”
खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात ,किती मनाला लागेल असं बोलतात ,कशाचाच भान ठेवत नाही ,समोरच्याला काय वाटेल?
त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत , याचं कसलंच भान नाही या माणसाला,
मग अशा माणसाची चीड नाही येणार का.?
बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते.
अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय.
पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं?
काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे''.
मिलिंद गवळीनं पुढं लिहिलं आहे,''बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं , न बोलून सांगतात कोणाला!
बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे,
पहिल्या एपिसोड मध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय.
सांगायचा मुद्दा काय आहे की , त्यांनी ही बडबड केल्यानंतर जे काय डोक्याचा भुगा होतो , तो कसा निस्तारायचा,
तर शांत बसायचं. Meditation करायचं ,
पूर्वी बरं होतं , एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती,
तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं , छान वाटायचं, ति जवळ येऊनच बसायची,
तिच्या बरोबर माझं डोकं शांत व्हायचं
पण काय सगळ्यांना कुत्रे ,मांजरी ,पक्षी ,प्राणी आवडत नाहीत.
त्यांच्यापैकी एक एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्ये मध्ये यायची म्हणून, त्यांना disturb व्हायचं.
These are the realities of life…
पण मग
हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो
आणि बाहेर यायचं नावच घेत नाही''.
'आई कुठे काय करते' ही मालिका खरंतर आता एका रंजक वळणावर आहे. अरुंधतीनं प्रेक्षकांनी अंदाजही लावला नसेल असे काही निर्भिड निर्णय घेतले ज्याचं सर्वच स्तरातून कौतूक झालं. अनेकदा ट्रॅक रटाळ झाल्यानं मालिकेच्या टीआरपी वर परिणाम झाला पण तेव्हाच मालिकेच्या लेखिकांनी वेळीच अनेक रंजक वळणं मालिकेत आणून पुन्हा मालिकेला योग्य मार्गावर आणलं.
या मालिकेनं पहिल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड घट्ट केली आहे. आता अनिरुद्ध साकारणारा मिलिंद गवळी भले म्हणत असला मला राग येतोय माझ्या भूमिकेचा..पण जेव्हा असं एखाद्या भूमिकेसाठी वाटतं तेव्हा समजून जा भूमिका सॉल्लिड रंगवताय तुम्ही..आता मिलिंदराव..तुम्ही सिनियर आर्टिस्ट आहात...हे तुम्हाला काही नव्यानं सांगायला नकोच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.