खासगी रुग्णालयावर अभिनेत्रीचा संताप; राजेश टोपेंना केला सवाल

'..यांना फक्त पैसे कमवायचे आहेत'
Ashwini Mahangade, Rajesh Tope
Ashwini Mahangade, Rajesh Tope
Updated on

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या Ashwini Mahangade वडिलांचं काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झालं. वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांच्या निधनानंतर अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. अश्विनीने आता पुन्हा सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित खासगी रुग्णालयाच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. 'आता व्यक्त व्हायला हवे, कारण आमच्यासारखे आणखी कोणी पोरके होऊ नये हेच वाटतंय', असं लिहित अश्विनीने रुग्णालयाविषयी पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे अश्विनीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनासुद्धा सवाल केला आहे. (aai kuthe kay karte actress ashwini mahangade asked question to rajesh tope about private hospitals treatment)

राजेश टोपेंना सवाल

'या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना विचारायचा आहे की, ज्या खासगी हॉस्पिटलला तुम्ही कोरोना सेंटर म्हणून पत्र देता, त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहीतच धरता का? मी अनुभवाशिवाय बोलत नाही. पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारंच. पेशंटवर कधी आणि कोणते उपचार सुरू आहेत याची माहिती घरच्यांनी जाणून घेणे हा गुन्हा आहे का? असेच चालत राहीले तर यांना कोणीच जाब विचारणारे राहणार नाहीत. बाकी कागदोपत्री यांना पोसणारे सरकारी यंत्रणेतील मंडळी आहेतच. यात शेवटी गोरगरीब आणि तोंड गप्प ठेवणाराच भरडला जाणार', असा सवाल तिने केला.

Ashwini Mahangade, Rajesh Tope
निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची रंजक कहाणी

बाबर रुग्णालयावर संताप

'नाना उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्यांच्यावर काय उपचार झाला, यातले आम्हाला काहीच माहित नाही. ना आमच्यापैकी कोणी नानांना आत जाऊन भेटले. हे डॉक्टर नेमका काय उपचार करत आहेत, हे सांगण्यासाठी ते बांधिल नाहीत का? पण आपण प्रश्न विचारला तर या डॉक्टरांचा इगो दुखावतो की यांना काय अक्कल आहे की हे आम्हाला प्रश्न विचारतात. वाई आणि आजूबाजूच्या सर्व गावातील माझ्या तमाम बंधू-भगिनींना विनंती मात्र नक्की करेन की तुम्हाला माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया आपल्या नातेवाईकांना बाबर हॉस्पिटल, वाईमध्ये उपचारासाठी पाठवू नका. कारण सरकारी प्रोटोकॉल या दोन अक्षरांच्या छताखाली हे लोक काय उपचार करतात हे त्यांचे त्यांनासुद्धा माहित नसेल कदाचित आणि यांना पैसे कमवायचे आहेत फक्त', अशा शब्दांत अश्विनीने राग व्यक्त केला.

कोण आहे अश्विनी महांगडे?

अश्विनीने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत राणू आक्का साहेबांची भूमिका साकारली होती. ती सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अश्विनीने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Ashwini Mahangade, Rajesh Tope
'आता तरी लग्न कर'; कॅन्सरग्रस्त किरण खेर यांचा व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()