शिर्डीच्या साईबाबांच्या नवसाने... Milind Gawali गवळी आईच्या आठवणीत भावूक

खऱ्या आयुष्यात मिलिंद गवळी आईवर जीव तोडून प्रेम करत असतात
milind gawali, aai kuthe kay karte
milind gawali, aai kuthe kay karteSAKAL
Updated on

Milind Gawali News: आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम त्यांच्या आयुष्याबद्दलच्या आठवणी, किस्से उलगडून सांगत असतात. मिलिंद गवळी मालिकेत आई आणि अप्पांवर प्रेम करतात.

तसंच खऱ्या आयुष्यात मिलिंद गवळी आईवर जीव तोडून प्रेम करत असतात. मिलिंद गवळी यांची आज या जगात नाही. मिलिंद गवळी यांनी आईची आठवण जागवणारी भावुक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.

(aai kuthe kay karte fame actor milind gawali emotional about his mother)

milind gawali, aai kuthe kay karte
Shiv Thakare बिग बॉस जिंकला आणि Veena Jagtap चं 'ते' स्वप्न झालं पूर्ण..

मिलिंद गवळी यांनी आईचे फोटो पोस्ट करून तिच्याविषयी भावुक पोस्ट शेयर केलीय.. मिलिंद लिहितात.. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"

आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता.. माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम, श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं..

मिलिंद आईच्या श्रद्धाळू वृत्तीबदल पुढे लिहितात.. "असीम प्रेम , सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये , लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे , मग तो मग तो कोणीही असो,

मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा, प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही"

milind gawali, aai kuthe kay karte
आई तुझी सून मिळाली..! Bhagyashree Limaye चा मनमोहक अंदाज

आईची परमेश्वरावर किती श्रद्धा होती याचा उल्लेख करताना मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे कि.. असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन, शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत राहायला घर दिलं,

शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडन मागून घ्यायची, आणि त्याला द्यावं लागायचं , त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची,

संतोषी मातेचे व्रत असो ,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवारचा साईबाबाचे उपास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास, बुधवारी माहीम चर्चला जायचं, मदर मेरीशी सुद्धा तिची मैत्री होती,

शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे"

पुढे मिलिंद गवळी यांनी आईची एक भावुक आठवण सांगितली आहे.. "माझी बहीण संगीता तिची दहावीची परीक्षा , दुसऱ्या दिवशी कुठलं तरी विषयाचा paper होता आणि घरी पाहुणे आले,

आई माझ्या बहिणीला म्हणाली "अग काळजी करू नको.. मार्क काय तुला माझे परमेश्वर भरपूर देईल , अभ्यास सोड आणि मला स्वयंपाकात मदत करायला ये", आणि निकाल लागला तर ती चांगल्या मार्गाने पासही झाली होती."

milind gawali, aai kuthe kay karte
Section 84.. काय आहे हे प्रकरण? Amitabh Bachchan यांची मोठी घोषणा.. दिसणार या भूमिकेत

मिलिंद यांनी शेवटी सांगितलं आहे, "खरच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तिच्या परमेश्वरा मुळेच पूर्ण झालंय, नाहीतर शिक्षणाचा आणि माझा 36 चा आकडा होता. तिच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही घडत नव्हतं आणि अजून ही नाही.

ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे , आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते, मला तर खात्रीच वाटते , की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल.

तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असे. आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल. मातृ देवो भव"

अशी भावुक आठवण मिलिंद गवळी यांनी शेयर केलीय. मिलिंद गवळी यांचं यश आणि लोकप्रियता पाहायला त्यांची आई आज हयात नाही. पण मिलिंद गवळी यांच्या आई जिथे कुठे असतील तिथे त्यांना लेकाचा अभिमान वाटत असेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()