'आई कुठे काय करते'ची अभिनेत्री करतेय रुग्णांच्या नातेवाईकांची मदत

कोणताही गाजावाजा न करता अभिनेत्रीचं सामाजिक कार्य सुरू
ashvini mahangade
ashvini mahangade instagram
Updated on

सध्याच्या काळात आपापल्या परीने जमेल तशी एकमेकांची मदत केली तर कोरोनासारख्या गंभीर समस्येवर आपण मात करू शकतो, हे वेळोवेळी अनेकजण पटवून देत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या मदतीत खारीचा वाटा उचलत आहेत. 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेतील 'अनघा' अर्थात अभिनेत्री अश्विनी महांगडेसुद्धा Ashvini Mahangade गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. काहींना औषध तर काहींसाठी बेडची व्यवस्था, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवण उपलब्ध करून देत अश्विनी गरजूंची मदत करत आहे. (aai kuthe kay karte fame actress ashvini mahangade providing free food for corona patients relatives)

'पेशंटसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय. कोरोनाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती आणि शक्य त्या ठिकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा,' असं आवाहन अश्विनीने केलं आहे.

हेही वाचा : किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी अफवा; अनुपम खेर यांची नेटकऱ्यांना विनंती

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थादेखील अश्विनी चालवते. या संस्थेअंतर्गत तिने अनेक उपक्रम राबविले आहेत. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही अश्विनीने मोलाचा वाटा उचलला आहे. तिच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.