Radhika Deshpande: मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता पण.. अभिनेत्रीची एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट..

चार हात, दोन फोन, एक नाथ.. म्हणत अभिनेत्री राधिका देशपांडेनं लिहिलं पत्र..
aai kuthe kay karte fame actress radhika deshpande shared post and say thanks to cm eknath shinde after helping to get theatre
aai kuthe kay karte fame actress radhika deshpande shared post and say thanks to cm eknath shinde after helping to get theatre sakal
Updated on

Radhika Deshpande: मराठी मनोरंजन विश्वात नाटक, मालिका, सिनेमा ह्यामध्ये विविध प्रयोग करणारी सर्जनशील अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. राधिकाचे मनोरंजन क्षेत्रातील काम खूप वेगळे आणि मोठे आहे. पण तिची लोकप्रिय ओळख म्हणजे देविका..

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिका अरुंधतीच्या खास मैत्रीणीची म्हणजे 'देविका'ची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे.

राधिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती आपले अनुभव, फोटो शेयर करत असते. मध्यंतरी राधिकाणे एक पोस्ट शेयर करत शासकीय कारभाराविषयी संताप व्यक्त केला होता.

झाले असे की, राधिका देशपांडे उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाट्य शिबिर घेत असते. याच शिबिरासाठी तसेच तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ या तिच्या नाटकांच्या तालमी साठी ती जागेच्या शोधत होती. यानिमित्ताने शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत होती.

पण कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी तिने या संदर्भात तिने एक वास्तव मांडणारी पोस्ट लिहून संताप व्यक्त केला होता. यावेळी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे. आता याच प्रकरणाची पुढची अपडेट सांगण्यासाठी राधिकाने पुन्हा एक पोस्ट शेयर केली आहे.

(aai kuthe kay karte fame actress radhika deshpande shared post and say thanks to cm eknath shinde after helping to get theatre)

aai kuthe kay karte fame actress radhika deshpande shared post and say thanks to cm eknath shinde after helping to get theatre
TDM Movie: आता जाळ अन् धूर संगच.. 'या' दिवशी पुन्हा रिलीज होतोय भाऊराव कऱ्हाडेंचा 'टिडीएम'..

या पोस्ट मध्ये राधिका म्हणाली आहे, "चार कागद, दोन सह्या, एक शिक्का" ते "चार हात, दोन फोन, एक नाथ." "सियावर रामचंद्र की जय".. मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध.''

''मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, "मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत." तसेच घडले.''

''ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे.
"देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है", असं मला दिसतं आहे.''


''पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. ''

''आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. ''

''मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. "एक नाथ कसा असावा तर असा!" धन्यवाद.''

''अतिथी म्हणून आलेल्यांसाठी आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आरास आहे आणि आम्ही झालर बनून उभे आहोत आशेने पहात. धन्यवाद. २ माणसं वाईट भेटली पण ४ चांगली माणसं ही भेटली आम्हाला! विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मंजुश्री ताई खर्डेकर, संदीप खर्डेकर, सचिन पाषाणकर, किरण साळी, राहुल सर. धन्यवाद.''


"चार कागद, दोन सह्या, एक शिक्का" ची कहाणी "चार हात, दोन फोन, एक नाथ" पर्यंत सुफळ संपन्न. बोलो.. सियावर रामचंद्र की जय" अशी पोस्ट राधिका देशपांडे हिने शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.