Madhurani Prabhulkar: मधुराणीनं अखेर मौन सोडलं! कारण सांगत म्हणाली,..

Madhurani Prabhulkar: मधुराणीनं अखेर मौन सोडलं! कारण सांगत म्हणाली,..
Updated on

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या मालिकेत मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Madhurani Prabhulkar: मधुराणीनं अखेर मौन सोडलं! कारण सांगत म्हणाली,..
Akash Thosar: जय शिवराय म्हणत नाशिकच्या उंच कड्यावरुन आकाशने मारली उडी, फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला

काही दिवासांपुर्वी मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर सोबत सुरु केलेल्या मिरॅकल्स डान्स संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.

ती अचानक या पदावरुन निघाल्यामुळे अनेक चर्चा ससुरु झाल्या होत्या. त्यातच मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही पसरल्या. मात्र प्रमोद प्रभुलकरनं या बातम्या फेटाळून लावल्या.

आता मधुराणीने अखेर संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की इतका खळबळजनक किंवा चर्चा करण्यासारखा विषय नव्हता. अनेक वर्षांपूर्वी तिने आणि प्रमोदने मिरॅकल अकॅडमी सुरू केली. मात्र नंतर तिला लक्षात आलं की त्या अकॅडमीसाठी तिला वेळच मिळत नव्हता. कारण अकॅडमी हा तिच्या अवाक्याचा भाग नाही. आणि ते स्वप्नही मधुराणीचं कधीच नव्हतं .

Madhurani Prabhulkar: मधुराणीनं अखेर मौन सोडलं! कारण सांगत म्हणाली,..
Swara Bhasker Video: स्वरा जरा जपून, गरोदरपणात असं नाचणं बरं नाही! नेटकऱ्यांचा सल्ला

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरु झाल्यानंतर ती खुपच व्यस्त झाली आणि तिला मालिकेच्या व्यस्ततेमुळे अकॅडमीची शाखा कुठे आणि त्यात काय शिजतयं हे माहित नव्हतं. मालिकेच्या शुटिंगमधुन वेळ मिळाला की तो वेळ ती मुलीसबोबत घालवते.

त्यामुळे तिने शांतपणे विचार करुन हा निर्णय घेतला. त्या अकॅडमीसाठी तिला वेळच काढता येत नव्हता त्यामुळे संचालिकापद मिरवण्यात अर्थच उरला नाही. म्हणुन तिने तिचा पती प्रमोदलाच या अकॅडमीची संपुर्ण जबाबदारी सोपवली. असं तिनं सांगतिलं.

Madhurani Prabhulkar: मधुराणीनं अखेर मौन सोडलं! कारण सांगत म्हणाली,..
Bigg Boss Ott 2: एल्विशच घरात बिग 'बॉस'! वोटिंगचा रेकॉर्डच मोडला, तर सलमाननं जियाचा क्लास घेतला..

प्रमोदच्या कामाबद्दल आणि अॅकेडमीबद्दल बोलतांना मधुराणी बोलते की, या अॅकेडमीने खुप चांगले कलाकार घडवले आहेत. प्रमोद खुप चांगलं काम करत आहे. ती म्हणाली की, 'मी ज्यावेळी त्यात सक्रीय होते तेव्हा खरोखर मी सक्रीय होते, पण आता मला वेळ देताच येत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं की वेगळं झालेलं बरं.'

मिरॅकल्स अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅंड प्रायव्हेट लिमिटेड' मधुन बाहेर पडण्याचं कारण सांगत मधुराणीनं बाकीच्या होणाऱ्या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.