Laal Singh Chaddha Movie: एक तर चार वर्षांनी आमिर खाननं लाल सिंग चढ्ढाच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. मात्र ते काही त्याला फार दमदार यश मिळवून देईल असे वाटत नाही. त्याचे कारण उद्या त्याचा प्रदर्शित होणारा लाल (Bollywood Movie) सिंग चढ्ढा अजुनही सोशल मीडियावर बॉयकॉट म्हणून ट्रेंड होताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून लाल सिंग चढ्ढावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या आमिरनं प्रेक्षकांना आता भावूक होत आपला चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. सगळं काही विसरुन चित्रपट जरुर पाहा. असे आवाहन त्यानं केलं आहे.
फक्त आमिर खानच नाही तर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर (Aamir Khan movies) देखील नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आमिरसोबत (Akshay Kumar Rakshabandhan News) अक्षयनं देखील नेटकऱ्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. एका मुलाखतीमध्ये आमिरनं मी जे काही बोललो त्याबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मात्र माझ्या बोलण्यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर मी त्याबद्दल त्यांची माफी मागतो. मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. त्यामुळे अजुनही माझ्यावर नाराज असणाऱ्यांची माफी मागतो असे आमिरनं म्हटले आहे.
हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक म्हणून लाल सिंग चढ्ढाकडे पाहिले जात आहे. आमिरनं या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये करिना कपूर, नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. यापूर्वी आमिरनं त्याच्या वेगवेगळ्या मुलाखतीतून लाल सिंग चढ्ढावर प्रेक्षकांनी नाराज होऊ नये असे सांगितले होते. त्यामुळे आता पुन्हा त्यानं चाहत्यांची माफी मागितली आहे.
लाल सिंग चढ्ढा हा उद्या प्रदर्शित होणार आहे. 2015 मधील एका मुलाखतीवर आमिरला ट्रोल केले जात आहे. त्यावेळी त्याला त्याची पत्नी किरण रावनं आपण आता भारतात न राहता परदेशात राहायला जाऊ असे सुचवले होते. त्याचे कारण भारतात वाढत चाललेली असहिष्णुता. त्यामुळे तिनं आमिरला भारतात राहू नये असे सांगितले होते. आमिरनं त्याची पुनरावृत्ती त्या मुलाखतीमध्ये केली होती. मात्र त्याचे उलटे पडसाद आमिरवर उमटल्याचे दिसून आले. त्याच्या चित्रपटांना ट्रोल करण्यात आले. आमिरनं आता पुन्हा एकदा आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील माफी मागितली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.